Ads

चोरीची कार विक्रीसाठी प्रयत्नात असलेल्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या The local crime branch arrested the thief who was trying to sell the stolen car

चंद्रपुर :-चंद्रपुर जिल्हयात चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमी असल्याने अभिलेखावरील अउघड गुन्हे तात्काळ उघडकिस आणणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह परदेशी, मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार यांचे मार्गदर्शना खाली शाखेचे पथकांना आदेशीत केले होते.
The local crime branch arrested the thief who was trying to sell the stolen car
मा. पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात प्रभावी पेट्रोलींग करून चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याचे निर्देश दिले होते. दिनांक 24/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गोपनीय बातमीदाराचे माहीती वरून स्थागुशा. येथिल अधिकारी व कर्मचारी यांनी पेट्रोलींग करीत असतांना एक इसम सामान्य रुग्णालय, चंद्रपूर परीसरात मोपेड गाडीने फिरून चारचाकी वाहन विक्री करण्याचे उददेशाने फिरत आहे. व ग्राहक शोधत आहे अशा माहिती वरूण संशयीत मोपेड चालकास सामान्य रुग्णालय, चंद्रपूरच्या समोरूण ताब्यात घेतले व त्यास विचारपुस केली असता त्यांनी व त्याचे मित्रांनी पो. स्टे. सावली हद्दीत कार चोरी केल्याची कबुली दिली. व सदर कार ही सामान्य रुग्णालय परीसरात लपवून ठेवली आहे. अशा कबुली वरून वैभव राजेश डोंगरे वय 25 वर्षे रा. मोखाडा ता. सावली जि चंद्रपूर ह. मु. इंदिरानगर चंद्रपूर त्यांचेकडुन त्यांनी लपवून ठेवलेली टाटा अल्ट्राज कार क. MH-34-BV-1302 ची कि. 3,00,000/- रू. तसेच त्यांनी गुन्हयांत वापरेली मोपेड गाडी क. MH-14- EX-6646 कि. 60,000/- रू. असा एकुण 3,60,000/-रु. चा माल जप्त करण्यात आला आहे.

सदर कर्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह परदेशी, मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार, सपोनी. बोबडे, गायकवाड, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, पोशि. मिलींद जांभुळे, यांनी केली आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment