Ads

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा आयोजित रन फॉर महाराष्ट्र मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख- स्थानिक भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीच्या वतीने दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी सात वाजता "रन फॉर महाराष्ट्र " या बिरूदाने मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून करण्यात आली होती.
Spontaneous response to Run for Maharashtra Marathon organized by Bhadravati Shikshan Sanstha Bhadravati
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती हे नाव शिक्षण , संशोधन , क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातही आपल्या कर्तुत्वाने अर्धशतकापासून सुपारीचीत आहे उपरोक्त क्षेत्रात संस्था दरवर्षी अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते.

भद्रावती करांच्या सुदृढ आरोग्याच्या व राष्ट्र निर्मितीच्या उद्देशाने भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती मागील काही वर्षापासून स्पर्धांचे आयोजन करीत असते. त्या सर्व स्पर्धांना भद्रावतीकरांच्या उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

या मॅरेथॉन स्पर्धेला भद्रावती व परिसरातील लहान मुले, मुली, सर्व शाळांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तरुण वर्ग, सर्व महिला वर्ग, भद्रावतीतील सर्व सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

या स्पर्धेला सकाळी ७ वाजता भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती चे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे , सचिव डॉक्टर कार्तिक शिंदे , सहसचिव डॉक्टर विशाल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय नयोमी साटम , उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात केली. याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर लेमराज लडके , प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे , श्री रवींद्र शिंदे , संचालक मध्यवर्ती बँक, चंद्रपूर , डॉक्टर प्रिया शिंदे , अविनाश शिदमशेट्टीवार , प्रवीण बंग शेखर सिंग , श्री सुधीर वर्मा , पोलीस उप निरीक्षक, , गुरुदेव सेवा मंडळ , लोकमत सखी मंच , व्यापारी असोसिएशन , जय हिंद फाउंडेशन , पतंजली योग डान्स ग्रुप, सायकलिंग ग्रुप, मॉर्निंगवॉक ग्रुप, माजी सैनिक ग्रुपचे कर्नल भूपेंद्र जी रावत साहेब, जय हिंद फाउंडेशन, व परिसरातील शाळा महाविद्यालयाच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्राच्या प्रगती करिता व उत्तम आरोग्य करिता उपस्थितांच्या हस्ते हवेत फुगे सोडून एकात्मतेचे दर्शन घडविले.

ही मॅरेथॉन स्पर्धा यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरुवात करून गवराळा गेट व परत अशी आयोजित करण्यात आली होती.

या मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ महिलांमधून प्रथम क्रमांक आभा कौशिक, महिला मधून प्रथम क्रमांक मंजुश्री नक्षीने द्वितीय क्रमांक सौ पुष्पा विशाल गौरकार, मुलींमधून प्रथम क्रमांक कुमारी प्रणाली चौधरी, द्वितीय क्रमांक सुहानी शिरपूरकर, लहान मुली मधून प्रथम क्रमांक अनुश्री शिवणकर, द्वितीय क्रमांक अंजली कपाट व तृतीय क्रमांक नव्या तोगावकर, ज्येष्ठ नागरिकांतून प्रथम क्रमांक डॉक्टर नक्षीने, द्वितीय क्रमांक भूपेंद्र रावत, तृतीय क्रमांक श्री महात्मे व सचिन चिखलवार, लहान मुलांमधून प्रथम क्रमांक कार्तिक बद्दलवार, द्वितीय क्रमांक श्वास्वत राव व ओमकार तृतीय क्रमांक ओमकार नागरकर तर यंग मुलांमधून प्रथम क्रमांक शिवाजी गोस्वामी, द्वितीय क्रमांक दुर्योधन शेंडे तर तृतीय क्रमांक महादेव जायभये यांनी पटकाविला.

या सर्व विजेता स्पर्धकांना डॉक्टर विवेक शिंदे, डॉक्टर कार्तिक शिंदे, डॉक्टर विशाल शिंदे, श्री रवींद्र शिंदे, प्राचार्य डॉक्टर एल. एस लडके, प्राचार्य डॉक्टर जयंतराव वानखेडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच श्री शेखर सिंग यांनी उत्कृष्ट महाराष्ट्रीयन वेशभूषा करून स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल त्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.

या मॅरेथॉन स्पर्धेचे संचालन प्राध्यापक डॉक्टर सुधीर मोते तर आभार प्रदर्शन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव, प्राध्यापक डॉक्टर कार्तिक शिंदे यांनी केले.

या मॅरेथॉन स्पर्धेला भद्रावती स्थित सर्व शाळा महाविद्यालय, सर्व सामाजिक संघटनांनी तसेच भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत सर्व शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर लहान मुलापासून, युवक, युवती, नागरिक, महिला, जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment