भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती आपल्या विविध मागण्यांना घेऊन बरांज येथील प्रकल्पग्रस्त महिलांचे गेल्या तीन महिन्यांपासून एमटा कोळसाखान परिसरात आमरण उपोषण सुरू आहे.अद्याप पर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात न आल्याने व प्रशासनाने व इतर यंत्रणांनी या उपोषणाची दखल न घेतल्याने आंदोलन कर्त्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत जलसमाधी घेण्याचा इशारा दिल्याने प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घटनास्थळी पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक तथा आपत्ती व्यवस्थापन पथक तैण्यात करण्यात आले आहे. दरम्यान दिनांक ९ला विस आंदोलनकारी महिला खाण परिसरातील एका पाणी भरलेल्या खड्ड्याजवळ गोळा झाल्या व पाणी भरलेल्या खड्यात उतरल्या होत्या मागण्या पुर्ण करु असे आश्वासन देण्यात आल्यानंतर दहा महिला खड्यातून बाहेर पडल्या मात्र आश्वासन लेखी द्या अशी मागणी करीत उर्वरीत विस महिला कापासून अद्यापही खड्यातच आहे.
Baranj project-affected women warn of drowning, police force deployed in mine area.
दरम्यान घटनास्थळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तथा पोलीस प्रशासन घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अनुचीत प्रकार रोखण्यासाठी सर्व यंत्रणा घटनास्थळी सज्ज झाल्या आहेत. बरांज गावाचे पुनर्वसन करावे, प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. अशा अनेक मागण्यांना घेऊन बरांज येथील प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणा दरम्यान प्रकल्पग्रस्त महिला व कंपनी प्रशासनामध्ये अनेक बैठकी पार पडल्या. मात्र, या सर्व बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने प्रकल्पग्रस्त महिलांचे उपोषण अद्यापही सुरूच आहे. यावर कोणताही तोडगा न निघाल्याने व मागण्या अद्याप पर्यंत पूर्ण न झाल्याने आंदोलन करत्या महिलांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण करण्यात येत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सदर आंदोलनकारी महिलांनी बोलून दाखवला आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सदर तिन महिन्यांपासून सुरु असलेल्या या ऊपोषणामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ ऊडाली आहे.आजपर्यंत कंपणीने व प्रशासनाने अनेक आश्वआसने देऊन वेळ मारुन नेली आहे.मात्र प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अद्याप तशाच आहे.त्यामुळे कंपणी तथा प्रशासनवर आमचा विश्वास राहील नसुन जोपर्यंत प्रकल्पग्रस्तंच्य मागण्या पूर्ण पुर्ण केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल असे प्रकल्पग्रस्त महिलांकडून सांगण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment