Ads

देशी दारूच्या 83 पेट्या 9 लाख रुपयांचा माल जप्त

बल्लारपूर :-जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतरही ग्रामीण भागात दारूच्या पुरवठ्यासाठी तस्करी सुरू आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील मुल व सावली येथे मोठ्या प्रमाणात तस्करीचे प्रकार सुरू आहेत. अशा परिस्थितीत बल्लारपूर पोलीस ठाण्यांतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Goods worth Rs 9 lakh seized including 83 boxes of country liquor
त्यामध्ये गुप्त माहितीच्या आधारे रात्री ८ वाजता पेपरमिल न्यू कॉलनीत टाटा एसी क्रमांक एमएच ३३ टी ४६७३ मधून दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दारूसह वाहन पकडले. वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या कारवाईत देशी दारूच्या 83 बॉक्ससह 9 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख यांनी ही कारवाई केली आहे. बल्लारपूर पोलिसांनी फरार वाहनचालक आणि दारू विक्रेत्याचा तपास सुरू केला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment