Ads

जिवाची बाजी लावून रेती तस्करी करणारे आणखी दोन ट्रॅक्टर गौण पथकातील तलाठी मस्के यांनी पकडले.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती महसूल विभागाने अवैध रेती तस्करी विरोधातील मोहीम चांगलीच तीव्र केली असून एक दिवसापूर्वी अवैध रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरला पकडल्यानंतर अवैध रेती तस्करी करणाऱ्या आणखी दोन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे.
Talathi Maske of the subordinate team caught two more sand smugglers risking their lives.
या दोन्ही ट्रॅक्टरला तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सदर कारवाई तालुक्यातील आष्टा येथील इरई नदी घाटावर करण्यात आली. महसूल विभागाच्या गौण खणीज पथकाचि पेट्रोलिंग सुरु असतांना आष्टा येथील ईरई नदिघाटावर पैलतिरि रेतिचा अवैध भरणा करित असलेले दोन ट्रॅक्टर आढळून आले. सदर ट्रैक्टर पळून जाण्याच्या बेतात होते. मात्र गौण खनिज पथकाचे तलाठी मस्के यांनी आपल्या जिवाची बाजी लावत चक्क नदीतून पोहत जाऊन पैलतीर गाठले सोबत असलेले नायब तहसीलदार खंडारे मंडळ अधिकारी वाटेकर, योगेश गहूकर, शिरीष कोल्हे, व अवैध रेती तस्करी करणाऱ्या दोन्ही ट्रॅक्टरला पकडले.
हे दोन्ही ट्रॅक्टर तालुक्यातील आष्टा येथील खिरटकर यांच्या मालकीचे असून या दोन्ही ट्रॅक्टरवर नंबर आढळलेला नाही. या घटनेची पुढील चौकशी महसूल विभाग करीत आहे.महसुल विभागाच्या या मोहिमेमुळे अवैध रेतीतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment