Ads

उच्च शिक्षीत तरूणा निघाला दुचाकी चोर ;4 चोरीच्या मोटारसायकल हस्तगत

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आढळुन आल्याने नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला संबंधित चोरीच्या प्रकाराला पायबंद घालण्याचे विशेष निर्देश देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार ह्यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथक तयार करुन मोटार सायकल चोरीचे रेकॉर्ड वरील गुन्हेगार शोध मोहीम सुरू केली.
Well-educated young man turned two-wheeler thief; captured 4 stolen motorcycles
दरम्यान पेट्रोलिंग करत असतांना पथकाला एक इसम विना कागदपत्राची मोटारसायकल विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्या आधारे पथकाने जिल्हा स्टेडिअम परिसरात सापळा रचून 25 वर्षीय आशिष शालिकराम रहांगडाले, रा. अष्टभुजा वार्ड, रमाबाई नगर, एकता चौक, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर ह्या
दुचाकी स्वराला ताब्यात घेवुन त्याचे कडुन पांढऱ्या रंगाची अक्टिवा मोपेड गाडी क्र MH34 BU-7349, सिमेंट रंगाची अ क्टिवा मोपेड गाडी क्र MH 29 AG 4781, काळ्या व निळ्या रंगाची स्प्लेंडर क्र MH 32 S 1335, काळ्या व लाल रंगाची एच एफ डिलक्स क्र MH. 34. BJ.5773 अशी एकुण चार वाहने अंदाजित किंमत रु.1,45,000/-हस्तगत केली. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींपैकी 3 दुचाकी चंद्रपूर येथिल रामनगर पोलीस ठाण्याच्या तर 1 दुचाकी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. विशेष म्हणजे चोरीतील आरोपी हा उच्चशिक्षित असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळुन आले.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंदपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात, पो.उप. नि. विनोद मुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ. नितीन रायपुरे यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment