Ads

जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी अर्धवट राहणार Due to the indifference of the district administration, the irrigation wells of thousands of farmers in the taluka will remain half-finished

घाटंजी ( तालुका प्रतिनिधी):-
चालू वर्षी शासनाने व जिल्हा प्रशासनाने गाजावाजा करीत घाटंजी तालुक्यासह जिल्ह्यात मग्रारोह  योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, इत्यादी योजनेतून हजारो शेतकऱ्यांच्या वैयक्तिक सिंचन विहिरी मंजूर केल्या परंतु सदर कामे करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला जमत नसल्याचे दिसते.
 तालुक्यात सदर कामाकरिता पंचायत स्तरावर पुरेशे मनुष्यबळ नसल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक सिंचन विहिरी, गुरांचे गोठे, घरकुल इत्यादी कामाचे मस्टर काढणे, एम बी रेकॉर्ड करणे, पेमेंट अदा करणे या कामाला तालुका पंचायत कडून विलंब होत आहे. 
तालुक्याच्या 72 ग्रामपंचायतीसह 110 खेड्यात   मग्रारोह योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना , शबरी आवास योजना, रमाई आवास योजना च्या हजारो लाभार्थ्यांना पंचायत समितीमध्ये हेलपाटे घ्यावे लागत आहे.
 याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यापूर्वी अनेक निवेदन देऊन सुद्धा जिल्हा व तालुका प्रशासन या संपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. या हजारो वंचित घटकाला सोबत घेऊन मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 ला पंचायत समिती समोर प्रलंबित मागण्याला घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हल्लाबोल आंदोलन Hallabol movement करण्यात येत आहे. यामध्ये  मग्रारोह योजनेचे पंचायत समिती स्तरावर मजुराचे मस्टर (हजेरी पत्रक) काढण्याकरिता तीन ते चार डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करावी, मग्रारोह  योजना यशस्वीपणे राबविणे करिता पुरेशे मनुष्यबळ सहकार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी ,कर्मचारी यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी.  मग्रारोह  योजनेचे मजुराचे मस्टर (हजेरी पत्रक) ग्राम स्तरावर  काढण्यासाठी जिल्ह्यात सुरू केलेल्या योजनेत घाटंजी तालुक्याचा समावेश करावा. डिसेंबर 2023 पासून प्रलंबित असलेला  मग्रारोह योजनेचा अकुशल निधी (मजुराची मजुरी) तात्काळ देण्यात यावी. अनुसूचित जाती- जमाती वैयक्तिक सिंचन विहिरी करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आदिवासी आवास योजना, रमाई आवास योजना या सर्व लाभार्थ्यांना तात्काळ निधी वितरित करण्यात यावा. घरकुल योजनेच्या व सिंचन विहिरीच्या सर्वत्र लाभार्थ्यांना शासकीय भावात रेती उपलब्ध करून देण्यात यावी या मागण्याच्या संदर्भात सदर आंदोलन करण्यात येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment