Ads

भद्रावती शहरासह तालुक्यात गारपीट व वादळाचे थैमान, रब्बी पिकांचे नुकसान.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:- भद्रावती शहर तथा तालुक्यातील गावांना दिनांक दहा रोज शनिवारला रात्रोच्या दरम्यान गारपिटासह भयंकर वादळाने झोडपले. या गारपीट तथा वादळामुळे तालुक्यातील 90% गावातील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तहसीलदारांनी तलाठ्यांना शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश द्यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांनी केली आहे.Hail and storm surge in Bhadravati town and taluk, loss of rabi crops.
शनिवारला रात्र अचानक गारपीट तथा प्रचंड वादळाला सुरुवात झाली. या घटनेत तालुक्यातील मांगली, तिरवंजा, चंदनखेडा मांगली , पिरली, सागरा, तथा तालुक्यातील 90% गावातील हरभरा, तूर, गहू व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. या वादळात रब्बी पीक जवळपास पूर्णपणे उध्वस्त झाले, तर या वादळामुळे अनेक झाडांच्या फांद्या व झाडे कोसळली. सदर घटना रात्रीच्या वेळेस घडल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. वादळामुळे शहरातील तथा तालुक्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या घटनेची गंभीरतेने दखल घेऊन तहसीलदारांनी तलाठ्यांना शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी शेतकरी वर्ग यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment