तालुका प्रतिनिधी जावेद शेख
भद्रावती :-जि.प. प्राथमिक शाळा,मानगाव, तालुका भद्रावती येथे सीखे इंडिया अंतर्गत असलेल्या TIP कार्यक्रम प्रदर्शनाचा प्रारंभ प्रभात फेरीने करण्यात आला . या प्रदर्शन कार्यक्रमाला गावातील smc सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला मंडळ, युवक आणि मोठ्या प्रमाणात पालकवर्गाची उपस्थिती होती. Mangaon Jilha parishad School learn in India Festival organized
सुरुवातीला गावातून बँड पथकाने प्रभात फेरी काढून आणि शिक्षणाविषयी घोषणा देवून प्रदर्शनाविषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर हाक्के , सरपंच सुनिल खामनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी गणिताचे मॉडेल व भाषा विषयाचे स्वहस्ताक्षरित पुस्तके तयार केली.
पालकांनी उत्साहाने आणि उत्सुकतेने विद्यार्थ्यांना प्रश्नही विचारले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पुस्तकातील गोष्टी विद्यार्थी स्वतः सांगत होते.
मागील दोन वर्षापासून भद्रावती तालुक्यात टीचर इनोव्हेटर कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना भाषा आणि गणित विषयाच्या विविध पद्धतींचे सिखे संस्थेमार्फत प्रशिक्षण दिल्या जाते. आणि त्यानंतर वर्षभर या शिक्षकांना कोचिंग केले जाते. विद्यार्थी या सर्व पद्धतीचा सराव त्यांना दिलेल्या कार्यपुस्तिकेत करत असतात. वर्षाच्या शेवटच्या सत्रात शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत घेतलेल्या या पद्धतींचे वेगवेगळे मॉडेल बनवून प्रदर्शित करतात.
या प्रदर्शनीला पंचायत समिती भद्रावतीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर सर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. सीखे कोच शिवशंकर बांदुरकर यांनी कार्यक्रमाचे महत्व सांगीतले तसेच कार्यक्रमास लाभलेल्या सरपंच सुनिल खामनकर यांनी शाळेत सुरू असलेला TIP कार्यक्रम अतिशय प्रभावी आहे आणि विद्यार्थ्यांस अतिशय उपयुक्त आहे, असे सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थी माता पालक, गावकरी, उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन – नितेश भोवरे हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रभाकर हाकके,
भद्रावती कोच शिवशंकर बांदुरकर, अश्विनी वरपल्लीवार यांनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment