Ads

सख्या बापाचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-सतत तीन वर्षांपासून आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका 55 वर्षीय नराधम बापास भद्रावती पोलिसांनी दिनांक ९.२.२०२४ रोज शुक्रवारला सकाळी आठ वाजता पोस्को कलम ४ अन्वये Under Section 4 of POSCO Act कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली आहे.बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार Abuse of a minor girl केल्याच्या प्रकाराने बाप व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना भद्रावती शहरात उघडकीस आली आहे.Father's abuse of minor daughter
शहरातील एका भागात राहणाऱ्या या आरोपीची पत्नी ही त्याच्यापासून वेगळी राहते. मात्र मुलगी ही बापाजवळ राहत होती. सदर नराधम बाप हा आपल्या पोटच्या मुलीवर 2021 पासून लैंगिक अत्याचार करीत होता. या प्रकाराची माहिती सदर मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने सदर मुलीसह भद्रावती पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर आईच्या समक्ष मुलीने भद्रावती पोलिसात या घटनेची तक्रार केली. त्यानंतर भद्रावती पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली. सदर घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या नेतृत्वात भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment