भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती लक्ष फाउंडेशन भद्रावती तर्फे स्वर्गीय पंजाबराव शिंदे स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय T20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 7 ते 18 फेब्रुवारी पर्यंत पिपराडे मैदान चंद्रपूर -नागपूर रोड येथे करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेत देशातील जबलपूर, लखनऊ, इटावा, बेंगलोर तेलंगणा तसेच राज्यातील जळगाव, नागपूर ,चंद्रपूर येथील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये अनेक नामांकित क्रिकेटपटूंचा समावेश असणार आहे.
स्पर्धेचे प्रथम बक्षीस दोन लाख अकरा रुपये तर द्वितीय एक लाख 11 हजार रुपये तसेच शील्डअसणार आहे. सोबतच व्यक्तिगत बक्षीस सुद्धा मोठ्या प्रमाणात देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक सात फेब्रू .ला सकाळी दहा वाजता होणार असून क्रिकेट प्रेमींनी या राष्ट्रीय स्पर्धेचा आनंद लुटावा असे आवाहन लक्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे, सुनील महाले, रोहन कुटे माटे ,नकुल शिंदे ,समीर बल्की, प्रशांत शिंदे सचिन सरपटवार यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment