चिमूर :-सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ गडचिरोली द्वारा संचालित ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोज मंगळवारला "जीवशास्त्रातील आधुनिक प्रवाह" "Modern Currents in Biology" या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
National Seminar on Modern Currents in Biology at Gram Gita College
या चर्चासत्रामध्ये जास्तीत जास्त प्राध्यापक व संशोधक यांनी भाग घेऊन त्याचा भविष्यात संशोधनासाठी उपयोग करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर ए. धमानी यांनी केले आहे. या चर्चासत्रास संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विजयभाऊ वडेट्टीवार, सचिव, सौ. किरणताई वडेट्टीवार, कोषाध्यक्ष श्री. किशोरभाऊ वडेट्टीवार व संस्थासदस्या कु. शिवानीताई वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान शाखा गोंडवाना विद्यापीठाचे अधिष्ठाता, डॉ. ए . झेड. चिताडे तसेच प्रमुख मान्यवर म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित सर आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूरचे माजी संचालक डॉक्टर एम. एम. गाडेगोने सर उपस्थित राहणार आहेत.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या तांत्रिक सत्राकरिता चेन्नई येथील प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फिल्ममेकर, मा. नल्ला मुथू सर हे वन्यप्राण्यांचे हालचाली व त्यांचे दैनदिन जीवन या विषयावर संवाद साधणार आहेत तर दुसऱ्या तांत्रिक सत्रा करिता वाईल्ड लाईफ बोर्ड, महाराष्ट्र राज्याचे माजी सदस्य, मा. श्री. कुंदन हाटे सर यांना आमंत्रित केले असून ते वन्यजीव उपचार, बचाव आणि पुनर्वसन या विषयावर तांत्रिक संवाद साधणार आहेत.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील संशोधकांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांच्या मार्गदर्शनात सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी कार्य करीत आहेत.
0 comments:
Post a Comment