Ads

जलसंधारण अधिकाऱ्यांची परीक्षा रद्द करा, दोषींवर कठोर कारवाई करा - राजू कुडे

चंद्रपूर : राज्यात होणाऱ्या रोजगार भरती परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. अमरावती येथे २० आणि २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या जलसंधारण अधिकाऱ्यांची परीक्षेत विद्यार्थ्यांकडे उत्तर पत्रिका आढळल्याने खळबळ उडाली आहे. या गैरप्रकारामुळे स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.Canceled exam of water conservation officers, take strict action against culprits - Raju Kude
आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी या गैरप्रकाराबाबत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. कुडे म्हणतात, "जलसंधारण अधिकाऱ्यांची परीक्षा तात्काळ रद्द करून परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर नवीन कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करावी.", "Strict action should be taken under the new law against the water conservancy officer examination to be canceled immediately and malpractices in the examination."

त्यांनी पुढे म्हटले, "TCS आणि IBPS च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षा MPSC च्या माध्यमातून घ्यावी आणि परीक्षा शुल्क कमी करावे."

यावेळी युवा जिल्हाउपाध्यक्ष विशाल माने, सुमित हस्तक, युवा संघटन मंत्री अनुप तेलतूमडे, युवा शहर अध्यक्ष महेश ननावरे, शुभम पाचभाई, ओम प्रकाश निषाद, प्रीतम कुंभारे, देविदास कोवे, शंकर सिडाम, भीमराज बागेसर, अनुज चव्हान, रणजित बोरकुटे, अक्षय चिंचोलकर तसेच मोठ्या प्रमानात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

*विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ*

कुडे यांनी स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थांवर टीका करताना म्हटले की, "या संस्था विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत. गैरप्रकारामुळे मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही करतो."
*मागण्या*
*जलसंधारण अधिकाऱ्यांची परीक्षा तात्काळ रद्द करा.
*परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर नवीन कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करा.
* TCS आणि IBPS च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षा MPSC च्या माध्यमातून घ्या.
* परीक्षा शुल्क कमी करा.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment