भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-वरोरा तालुक्यातील पोतरानाला लगतच्या खांबाळा नाल्यातून अवैध रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर वरोरा पोलिसांनी कारवाई करीत दोन ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 ए पी 1807 व बिना नंबरचे ट्रॉली व ट्रॅक्टर क्रमांक एम एच 32ऐ च0422 वट्राली क्रमांक एम एच 40ए4063 व असा एकूण आठ लाख सात हजार मुद्देमाल रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Warora police action against two tractors smuggling illegal sand
याप्रकरणी आरोपी(1) आकाश लक्ष्मण उईके वय 26वर्ष राहणार बारावा ड्रायव्हर तालुका वरोरा (2) कपिल लक्ष्मण ढेकने वय 21 वर्ष ड्रायव्हर राहणार खंबाळा(3) वसंता दिलीप बावणे राहणार खांबाळा असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिनांक 24/2/24 रोज शुक्रवारला सदर नाल्यावर रेती तस्करी होत असल्याची गुप्त माहिती वरोरा पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर नंबर नसलेले ट्रॅक्टर अवैधरीत्या रेती भरताना आढळून आले. सदर ची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक मु मक्का सुदर्शन सा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, पोलीस सहाय्यक उपाधीक्षक नयोमी साटम पोलीस उपविभागीय अधिकारी वरोरा , पोलीस निरीक्षक अमोल काचोरे वरोरा यांच्या मार्गदर्शनात सपोनि योगेंद्रसिंग यादव,पो, हवा दिलीप सुरपो, पोअम शशांक बदामवार, नितीन तुराळे, महेश गाऊत्रे यांनी पार पाडली
0 comments:
Post a Comment