Ads

आष्टी काकडे येथील बेपत्ता इसमाचा गावातील शेतशिवारातच सापडला मृतदेह.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भद्रावती तालुक्यातील आष्टी काकडे येथील एका 57 वर्षीय इसमाचा अखेर गावातील शेतशिवारातच मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गाव परिसरात खळबळ उडाली आहे.
The dead body of the missing Man village of Ashti Kakade was found in the farm shed.
वामन दादाजी काकडे, वय 57 वर्ष, राहणार आष्टी काकडे. असे या मृतक इसमाचे नाव आहे.
या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक ती कारवाई केली व मृतदेह भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी पाठविला. मृतक वामन दादाजी काकडे हा गेल्या बारा दिवसांपासून घरातून निघून गेलेला होता. त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसात देण्यात आली होती. आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह गावातील एका शेतशिवारातच आढळून आला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment