घाटंजी तालुका प्रतिनिधी :-
चिखलवर्धा येथिल तत्कालीन सरपंच काही कारणास्तव अपात्र ठरविण्यात आल्याने सरपंच पदाचा प्रभार उपसरपंच आकाश नडपेलवार यांच्या कडे होता परंतु पेसा अंतर्गत ग्रामपंचायत असल्याने या ठिकाणी सरपंच अनु.जमातिचाच आवश्यक असल्याने आज दि. 26 / 2/ 2024 सोमवार, रोजी येथिल सरपंच पदांची निवडणूक लागली असता आकाश नडपेलवार यांच्या पॅनलचे उमेदवार जैतु पंतुजी मेश्राम यांची अविरोध निवड करण्यात आली.
Chikhalwardha Sarpanchpadi Jaitu Pantuji Meshram elected unopposed
यावेळी अध्याशी अधिकारी म्हणून रविंद्र शिंदे, तलाठी आर जि राठोड , ग्रामसेवक प्रभुदास भगत यांनी काम पाहिले .
यावेळी सदस्य कुसुम चव्हाण,वर्षा किनाके, किरण कुमरे, सोनाली जाधव ,शंभु पेंदोर, अर्जुन जाधव,योगिता आत्राम सर्व सदस्य हजर होते गणेश कुमरे, पो पाटोल सूधाकर चव्हाण झटळा सो उपाध्यक्ष विलास नेणारे जिल्हा प म. शाळा अध्यक्ष,वाघुजी गेडाम अशपाक शेख हजर होते उपस्थितीनी नवनिर्वाचित सरपंचांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 comments:
Post a Comment