Ads

मुकेश पाण्डेय यांची राष्ट्रीय पंच म्हणुन निवड

चंद्रपुर :-दिनांक १६ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत झुंझुणू, राजस्थान येथे अखिल भारतीय आंतर विद्यपीठ ग्रापलींग स्पर्धा All India Inter University Grappling Competition आयोजित केली आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारतातील विविध विद्यापीठ आपापल्या विभागांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
Selection of Mukesh Pandey as National Umpire

या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याकडून चंद्रपूर येथील स्थानिक निवासी श्री. मुकेश भिमसेन पाण्डेय (कुस्ती NIS कोच) यांची नियुक्ती पंच म्हणुन करण्यात आली आहे. या राष्ट्रीय पातळीवर आपल्या शहराचे उत्कृष्ट पंच श्री. मुकेश भिमसेन पाण्डेय हे हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा नामांकित राज्यांच्या पंचांच्या चमुसोबत राहुन महत्वाची भूमिका पार पडणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या ग्रापालिंग फेडरेशन ऑफ इंडिया व ग्रापालिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून श्री. मुकेश पांडेय यांची पंच म्हणुन निवड करण्यात आली हे विशेष.

या कौतुकासाठी ग्रापलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव श्री. संतोष देशमुख, तांत्रिक सचिव श्री. संदिप बोरसे, श्री. नारायण वाघाळे - नागपुर, श्री. ओम देशमुख नागपुर, श्री. जनार्दन कुसराम - गोंदिया, श्री. अमित मेश्राम गडचिरोली, श्री. महावीर वारहरे वर्धा, चंद्रपूर - जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री. उमेश पंधरे, श्री. भूषण देशमुख, श्री. सुमित शुक्ला, श्री. शार्विल देवारकर, श्री. विनोद द्विवेदी, श्री. अनिल ठाकुर, श्री. इम्रान पठाण श्री. मनोज बंडेवार यांनी या कामगिरी व नियुक्ती बद्दल शुभेच्छा दिल्या व समोर झुंझुनु, राजस्थान येथे होणाऱ्या ग्रपलिंग स्पोर्ट्स अखिल भारतीय विद्यपीठांच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment