Ads

चोरट्यांनी घरासमोरुन दुचाकी पळविली

(प्रशांत गेडाम)नागभीड- सावरगाव माता वार्ड तळोधी (बा.) येथील मोनील वसंतराव देशमुख (३७) यांनी आपल्या घरासमोर बजाज बाक्सर वाहन क्र. एम.एच.३४ एच. ०७४० ठेवली असतांना 3 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी लंपास केली.
The thieves stole the bike from the front of the house
सकाळी आपल्या घरासमोर असलेली गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तळोधी (बा.) पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. तळोधी (बा.) पोलीस स्टेशन चे ठाणेदार अजितसिंग देवरे व पि.एस.आय. भाष्कर पिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. मागील आठ दिवसांपूर्वी तळोधी बा.पासून काही अंतरावर असलेल्या कोजबी माल येथील राईस मिल मध्ये सुध्दा चोरट्यांनी रोख रक्कम व काही माल लंपास केला होता.
त्यामुळे त्वरित चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तळोधी (बा.) च्या वतीने करण्यात येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment