चंद्रपुर :-कोणतीही निवडणूक ही स्पर्धात्मक होत असते. विरोधी पक्ष म्हणून आणि काँग्रेसला पुन्हा सत्तेत येणे हे आमचे स्वप्न आहे. त्यामुळे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असे वायफळ, पालाड विधान करू नये, देवरावजी, बधीरभक्तीचा भोंगा आवरा असे प्रत्युत्तर शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर 2019 ची पुन्हा पुनरावृत्ती करून काँग्रेसचा झेंडा रोवला जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
Devraoji, stop the hoarse Speaker of blind devotion
चंद्रपुरात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या लोकसभा निवडणुकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांचे डिपॉझिट जप्त होईल, असा ध्येय आम्ही ठेवला आहे. त्यात गैर काय? मागील १० वर्षातील केंद्रातील भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. आता बदल हवा आहे. भाजप सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात अनेक लोकांना विकासाचा अनुभव आला नाही. भाजप सरकारने धार्मिक ध्रुवीकरण वाढवले आहे आणि सामाजिक सलोखा बिघडवला. भाजप सरकारवर अनेक आर्थिक धोरणांमध्ये अपयश आले. केवळ ईडीचा धाक दाखवून आमदारांची टोळी फोडण्याचे काम भाजप सरकारकडून केले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही विकासाची कोणतीही पाहिजे तसे काम झालेले नाही. केवळ बल्लारपूर आणि मुल तालुक्यात दोन-चार कामे करणे, सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, हीरो हीरोइनला बोलवणे, म्हणजे लोकसभा मतदारसंघाचा विकास नव्हे.मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर शहराचा विकास झालेला नाही. महानगरपालिका भाजपच्या ताब्यात असताना देखील केवळ आणि केवळ भ्रष्टाचार झाला. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा यासाठी कुठलाही राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थमंत्री असताना देखील निधी दिलेला नाही. या निवडणुकीमध्ये बाळूभाऊ धानोरकर यांनी बघितलेले स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, यासाठी महाविकास आघाडी सर्वतोपरी एकत्रितरित्या, एकजुटीने, एकसंघपणे काम करणार आहे. त्यामुळे देवराव भोंगळे यांनी विनाकारण नाक खुपसू नये. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये मागील निवडणुकीत भाजपची स्थिती काय झाली होती, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा 2019 ची पुनरावृत्ती करून काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा पलटवार देखील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment