वरोरा तालुका प्रतिनिधी :-दि.१६/०३/२४ रोजी मा. नयोमी साटम, सहा. पोलीस अधिक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांनी त्यांचे कार्यालयातील पोलीस स्टॉप व पोलीस स्टेशन वरोरा येथील पोलीस स्टॉप यांना सोबत घेवुन वर्धा नदीचे मार्डा रेती घाटावर रेड कारवाही केली असता अवैध्दरित्या रेतीचे उत्खनन करून रेती चोरी करणारे ०३ ट्रॅक्टर ट्राली सहीत आरोपी मिळुन आले. त्यात ट्रॅक्टर चालक किष्णा ज्ञानेश्वर निकुरे रा. कॉलरी वार्ड वरोरा, नितेश वामन पिंगे रा. जामगाव ता. वरोरा, संजय वसंता आत्राम रा. मार्डा ता. वरोरा हे मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन एकुन १५,४३,००० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात येवुन ट्रॅक्टर क. एमएच २९ वि २५२३, ट्राली क. एम एच २९ ए के ६१३८ चा मालक निसार अयुब खॉ पठाण रा. कासम पंजा वार्ड वरोरा, ट्रॅक्टर क. एमएच ३४ एपी ५११७, ट्राली बिना क्रमांकाची चा मालक नावेद इसाक शेख रा. एकार्जुना, ट्रॅक्टर क. एमएच ३४ बिवि २५१५, ट्राली बिना क्रमांकाची चा मालक अमोल काशीनाथ पाटील रा. कॉलरी वार्ड वरोरा यांचेविरूध्द कलम ३७९,३४ भादंवि सहकलम ४८ महाराष्ट्र जमीन महसुल संहीता १९६६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवुन तपासात आहे.
सदरची कारवाही ही मा. नयोमी साटम, सहा. पोलीस अधिक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे अधिपत्यात पोउपनि विलास बलकी, पो.अं. नितीन तुराळे, पो.अं. भाउराव हेपट, पो.अं. फुलचंद लोधी, जितेश चव्हाण, सचीन कुंभरे, प्रशांत बावणे, इरफान शेख यांनी पार पाडली.
0 comments:
Post a Comment