Ads

युवाशक्ती विचार मंच, वरोरा व लोकमान्य महाविद्यालय, वरोरा (राष्ट्रीय सेवा योजना) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

(सादिक थैम) वरोरा:- युवाशक्ती विचार मंच, वरोरा व लोकमान्य महाविद्यालय ( राष्ट्रीय सेवा योजना ) आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 मार्च 2024 रोज शनिवारला रक्तदान शिबिराचे आयोजन लोकमान्य महाविद्यालयात करण्यात आले.
Enthusiastic response to Blood Donation Camp organized in association with Yuva Shakti Vikha Manch, Warora and Lokmanya College, warora (National Service Scheme)
या शिबिराच्या सुरुवातीला छोटेखानी उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व यावेळी 58 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला युवाशक्ती विचार मंच, वरोरा व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. या शिबिरात प्रत्येक रक्तदात्याला युवाशक्ती विचार मंचातर्फे रक्तदान केल्याबद्दल सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला युवाशक्ती विचार मंचच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व लोकमान्य महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, रा.स.योजनेचे स्वयंसेवक, आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूरचे श्री इंगळे सर व कर्मचारी, इत्यादींची मदत मिळाली.
व या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता गणेश नक्षिणे, शकिल शेख, लोकेश रुयारकर, रोहीत घाटे, सौरभ साखरकर, लोकेश घाटे, समर्थ कुमरे, प्रा.जयश्री शास्त्री मॅडम, प्रा. तानाजी माने सर, प्रा.डॉ. शेंडे सर , युवाशक्ती विचार मंच व लोकमान्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले...
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment