घाटंजी तालुका प्रतिनिधी:-
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या कृषी क्षेत्राबाबतच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आयोजित 'किसान मजदूर महापंचायत'तर्फे रामलीला मैदानावर शेतकरी मोठ्या संख्येने जमले आहेत याचाच एक भाग म्हणून याचाच घाटंजीत वंचित च्या वतीने केंद्राविरोधात घोषणाबाजी केली.
केंद्राची धोरणे शेतकरी समर्थक असावीत, अशी शेतकऱ्याच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी केंद्र सरकारने स्थगित केलेले, काळे कायदे रद्द्द करावेत,मार्केट यार्ड मध्ये हमी भावापेक्षा कमी भावात शेतमाल घेतल्यास,संचालक वर कायदेशीर कार्यवाही करावी,इत्यादी मागण्या करिता दिल्ली येथे देश भारतातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकार दबाव तंत्राचा चा वापर करीत आहे त्या विरोधात वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्याचे मागे खंबीर पणे उभे राहून, त्यांचे हिताकारिता लढा तीव्र करण्याचे जाहीर केले म्हणून वंचित तर्फे दिल्ली येथील आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला आहे, घाटंजी तहसील कार्यालय येथे निदर्शने करून निवेदन देण्यात आले यावेळी वंचित चे तालुकाध्य संघपाल कांबळे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग निकोडे, डोंगरसिंग खोब्रागडे,वीरेंद्र पिलावन,दीक्षांत वासनिक,दादाराव गिणगुले, संतोष नगराळे, दिनकर मानकर, नितीन राठोड, प्रेमानंद उमरे, तुकाराम कोरवते व शेतकरी उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख गौरव शेंडे यांनी दिली
0 comments:
Post a Comment