(सादिक थैम) वरोरा : तालुक्यातील शेगाव येथील सर्व सामान्य कुटुंबातील करिष्मा अशोक निखारे हिने एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून द्वितीय श्रेणी अधिकारी बनण्याचा मान मिळविला आहे.यामध्ये तिची सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. तिच्या यशाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांनी करिष्मा व तिच्या आईवडिलांचा सत्कार केला.
Karishma of Shegaon became Assistant Project Officer
शेगाव येथे छोटीशी चाय टपरी चालवणारे अशोक निखारे यांची मुलगी कु. करिश्मा अशोक निखारे हिने २०२२ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करत गावासमोर आदर्श निर्माण केला आहे. करिश्माचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेगावं येथे ४ थी पर्यंत व ५ ते १० पर्यंत चे शिक्षण संत काशिनाथ महाराज कन्या विद्यालय, शेगाव बु. येथून पूर्ण केले. त्या नंतर तिने ११ व १२ वि चे शिक्षण आनंद निकेतन कॉलेज वरोरा येथून पूर्ण केले व अंजुमन कॉलेज अँड टेक्नॉलॉजी नागपूर इथून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे.
घरची परिस्तिथी हलाकीची असताना सुद्धा इथ पर्यंत शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी न मिळाल्याने तीने नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी २०१७ ला घरूनच सुरू केली.त्या नंतर २०२३ ला ती पुणे इथे क्लासेस साठी गेली.करिश्मा ची आई घरी शिवणकाम करुन वडिलांना घर चालवायला हातभार लावते. त्यामुळे तीच्या या यशा बद्दल सम्पुर्ण गावातून तीच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाचे कौतुक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्यासह येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी करिष्मा व तिच्या आईवडिलांचा सत्कार केला.
यावेळी माजी युवासेना जिल्हाप्रमुख व गोंदिया जिल्हा विस्तार मनीषज जेठानी, उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, उपतालुका प्रमुख राजू राऊत,पंचायत समिती भिवापूरचे माजी सभापती वामन निखाडे उपसरपंच साधना मानकर, ग्रामपंचायत सदस्य रेखा दडमल, प्रफुल वाढई, सतीश गायकवाड,रवी वाटकर, असलम पठाण, तुळशीराम घोडमारे,राकेश इखार, सतीश कोटकर व आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment