Ads

चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभाचे काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर  : चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर वणी-आर्णी लोकसभा (Lok Sabha Election) मतदार संघासाठी (Congress) कॉग्रेसकडून आता प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज रविवार रात्री 8.30 वाजता उमेदवार यादी काँग्रेसने जाहीर केली. काल शनिवार दि.23 मार्चला रात्री उशिरा काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार यादीत पूर्व विदर्भातील चंद्रपूरचे नाव नव्हते. त्यामुळे चंद्रपूरच्या जागेबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती.

Chandrapur - Vani - Arni Lok Sabha Congress candidate MLA Pratibha Dhanorkar

मागील दोन दिवसांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांचे नाव घेतल्या जात होते. परंतु वडेट्टीवार यांनी मुलगी शिवानी वडेट्टीवार हिला उमेदवारी देण्यासाठी आग्रही होते. पक्षश्रेष्ठीकडून विजय वडेट्टीवार यांना आग्रह केला जात होता. दरम्यान दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आ. प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनीही उमेदवारी मिळविण्यासाठी लढा सुरूच ठेवला असताना, त्यांना उमेदवारी मिळते की नाही, अशीही परिस्थिती निर्माण करण्यात आली. प्रतिभा धानोरकर यांनी मात्र उमेदवारीसाठी आपला लढा सुरूच ठेवला. आज सकाळी (Vijay Vadettiwar) विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना, हायकमांड नाव घोषित करतील, असे सांगून उत्सुकता कायम ठेवली होती. पक्षश्रेष्ठीसह अनेकांना मी दिल्लीत जावे, असे वाटत असल्याने पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतील तो मान्य राहील, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी जाहीर केली होती.

चंद्रपूर लोकसभेसाठी (Chandrapur Lok Sabha) काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यास विलंब करण्यात येत असल्याने नेमकी उमेदवारी कोणाला, विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर याबाबत कार्यकर्ते संभ्रमात होते. अखेर (Congress) काँग्रेस कडून चंद्रपूरची उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांनाच जाहीर करण्यात आली. प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात आता भाजपाकडून (Sudhir Mungantiwar) सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) असा सामना रंगणार आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment