कोरपना:-भारताच्या संस्कृतीत मानवता धर्माची पाळेमुळे सुफी संतांमुळे खोलवर रुजलेली असून संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने भारतात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने याठिकाणी राहत असल्याचे चित्र आहे.हजरत दुल्हाशहा बाबा,यांची पुरातन काळातील मजार नाल्याच्या काठावर, निसर्गरम्य व सौंदर्याने नटलेल्या याठिकाणी आहे.येथे मोठ्या संख्येने सर्व जाती,धर्माचे लोक एकत्र येऊन पूजा-अर्चना करतात. विशेषतः 'कुसळ' हे गाव आदिवासी लोकवस्तीचे असून या भागातील अनेक समाज बांधवांचे श्रद्धास्थान या ठिकाणी आहे.या भागातील सर्व जाती,धर्म एकतेचे प्रतिक म्हणून या ठिकाणची ओळख आहे.समाजात तेढ निर्माण होत असला तरी,सुफी संतांनी आम्हाला व थोर महात्म्यांनी मानवता हेच खरे तत्त्वज्ञान मनात रुजवून आपण समाजाचे कार्य करणे गरजेचे,असे मत राजुरा विधानसभाचे माजी आमदार ॲड.संजय धोटे,यांनी व्यक्त केले.ते कोरपना तालुक्यातील कुसळ येथे आयोजित तीन दिवसीय वार्षिक उर्स-उत्सव कार्यक्रमातील "कौमी एकता" समरोह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी दर्गा कमिटीचे अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी बाबाच्या पुरातन गावाचा इतिहास सांगितला.यावेळी माजी आमदार ॲड.संजय धोटे व उपस्थितांनी बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवून पुजा-अर्चना केली.
कोरपना तालुक्यातील 'कुसळ शरीफ' येथे हजरत अब्दुल रहमान दुल्हाशाह बाबा(र.अ.) यांचा तीन दिवसीय वार्षिक उर्स-उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी याठिकाणी दिसून आली. पोलीस यंत्रणेच्या कडेकोट बंदोबस्तामुळे या ठिकाणी तंबाखूमुक्त व विवाद मुक्त असा सोहळा पार पडला तसेच यात्रेमध्ये कोणीही अवैध व्यवसाय सुरू केला नाही यामुळे कोरपना येथील ठाणेदार एकाडे यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमने येथील सर्व स्थापने तंबाखूमुक्त खर्रामुक्त यात्रा करून एक नवीन पायंडा या ठिकाणी पाडल्याचे दर्गा कमिटीने म्हटले आहे.यावेळी प्रशासनातर्फे रुग्णवाहिका, अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.हजरत दूल्हेशहा बाबा यांचा तीन दिवसीय वार्षिक उर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.उर्स समारोपाच्या दिवशी कौमी एकता कार्यक्रमात जि.प.चे माजी सदस्य अविनाश जाधव,सैय्यद रमजान अली,सिडाम,शहेबाज़ अली,वैभव किनाके,कपील आत्राम,शुभम पंधरे,रमेश ठाकरे,नादीर कादरी,मोहब्बत खान पठाण,इसराइल शेख गुलाब,अजय पोराते इतरांची उपस्थिती होती.हजारो भाविक भक्तांनी या उर्स मध्ये सहभागी होऊन बाबाच्या दर्ग्याचे दर्शन घेऊन पुजा अर्चना केली.
0 comments:
Post a Comment