राजुरा ५ जानेवारी :-
देवरी येथील धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट सभागृहात श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था, शेडेपार, धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट देवरी व देवरी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
Badal Belle was awarded the state-level Pyaarvaya Bhushan Award.
या सोहळ्याचे उद्घाटन माजी आमदार सहसराम कोरोटे , देवरी विधानसभा क्षेत्र, आदिवासी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, शिवसेना यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन देवरी हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजूभाऊ उईके अध्यक्ष, नगरपंचायत देवरी, सरबजितसिंग (श्यांकी) भाटिया नगरसेवक, देवरी, अॅड. प्रशांत संगिडवार ,अध्यक्ष, धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट देवरी, प्रमोद संगिडवार, संतोष तिवारी माजी सभापती, पं. स. देवरी, प्रज्ञाताई संगिडवार (उपाध्यक्ष, नगरपंचायत देवरी, सीताताई रंगारी, पिंकीताई कटकवार ,नगरसेविका, घनश्यामजी निखाडे, विजयाताई निखाडे, शेखरजी कनोजिया, सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असलेले बादल नीलकंठ बेले यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पर्यावरण भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे सहायक शिक्षक म्हणून ते कार्यरत असून राष्ट्रीय हरित सेना इको क्लब चे विभाग प्रमुख आहेत. स्काऊट युनिट लीडर, वसुंधरा मित्र प्रशिक्षण घेतले आहे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राज्य अध्यक्ष, राजुरा तालुका पत्रकार संघाचे सचिव, महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी भूषविल्या आहेत. त्यांच्या गुणगौरबद्दल नेफडो संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष दीपक भवर, महासचिव आशिया रिजवी, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माजी आमदार ॲड.संजय धोटे, अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्कर येसेकर, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकीवार,मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, सारिपुत्र जांभुळकर, नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभुळकर, रूपेश चिडे, शिक्षण, क्रीडा ,सामाजिक क्षेत्रातील व पर्यावरणप्रेमी, वन्यजीव प्रेमी तसेच वनविभाग,सामाजिक वनीकरण विभागातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
------------------------------------------
या राज्यस्तरीय सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १३ मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये प्रशासक रत्न पुरस्कार – डॉ. चंद्रशेखर डोंगरवार (वैद्यकीय अधिकारी गट-अ, गडचिरोली, नागपूर विभाग) दर्पण गौरव पुरस्कार – किशोर शिवशंकर गडकरी
(दैनिक नवराष्ट्र, साकोली तालुका प्रतिनिधी) पर्यावरण भूषण पुरस्कार – बादल नीलकंठ बेले
(महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो संस्था, चंद्रपूर)
शिक्षक रत्न पुरस्कार – रामकृष्ण मदन चाचेरे
(सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झाडगाव, साकोली, भंडारा)
सहकार महर्षी पुरस्कार – डी. के. आरीकर (संचालक, चंद्रपूर नागरी सहकारी पतसंस्था)
आदर्श शिक्षिका पुरस्कार – ऋतुजा रवींद्र गावस (मुख्याध्यापिका, विवेकानंद स्कूल सानपाडा, नवी मुंबई)
ग्रामभूषण पुरस्कार – बापू शांताराम परब(मु. पो. केरवडे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) कृषी भूषण पुरस्कार – अनिल शिवलाल किरणापुरे (मु. पो. लवारी उमरी), ता. साकोली, जि. भंडारा)
नारीरत्न गौरव पुरस्कार – मेधा मनोज अग्रवाल (समाजसेविका, लेखिका, नागपूर)
गुणवंत विद्यार्थी पुरस्कार – आरती शिवराम खागर (जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, शेडेपार, ता. देवरी, जि. गोंदिया) समाजभूषण पुरस्कार – संतोषकुमार चंद्रकांतलाल तिवारी
(समाजसेवक, देवरी, गोंदिया)
सेवाभाव भूषण पुरस्कार (ट्रस्ट) –
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, अहमदनगर
भारतीय संस्कृती रक्षक (ट्रस्ट) पुरस्कार –
मांडोदेवी ग्रामीण जनकल्याण बहुउद्देशीय विकास संस्था, हिराटोला, ता. गोरेगाव, जि. गोंदिया या सर्व पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
---------------------------------------------
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रभू मनगटे व प्रा.अश्विनी झंजाळ यांनी केले. प्रास्ताविक ॲड. प्रशांत संगीडवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.घनश्याम निखाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजक संस्थांचे विशेष कौतुक केले. हा पुरस्कार सोहळा समाजातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा व नवचैतन्य निर्माण करणारा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमास नागरिक, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment