भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती तालुक्यातील बेलोरा येथील अरविंद रियालिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या विरोधात बेलोरा परिसरातील गावकऱ्यांनी दिनांक सात रोज गुरुवारला दुपारी तीन वाजेपासून तीन दिवसीय साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाला बसण्यापूर्वी गावकऱ्यांनी कंपनीची कोळसा वाहतूक बंद पाडून आंदोलन केले. त्यानंतर उपोषणाला प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
Three-day chain hunger strike of villagers of Belora area against Aurobindo Company.
आधी जमिनीचा मोबदला ठरवा, बेलोरा तथा परिसरातील गावांचे आधी पुनर्वसन करा, कंपनीत स्थानिक प्रकल्पग्रस्त व बेरोजगारांना कायमस्वरूपी नोकरी द्या,यासोबतच अन्य मागण्या उपोषणकर्त्या गावकऱ्यांनी सदर कंपनी समोर ठेवल्या आहेत. अरबिंदो कंपनीकडून या परिसरातील जुन्या डागा कोळसा खाणीतून कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे.खाणीच्या विस्तारासाठी बेलोरा तथा परिसरातील शेत जमीन कंपनीतर्फे संपादन करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र कंपनीने आधी गावांचे पुनर्वसन करून जमिनीचा योग्य मोबदला ठरवावा अशी मागणी गावकऱ्यांनी करून कंपनीच्या जमीन संपादनाला विरोध दर्शविला आहे. मात्र कंपनीने गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता सदर शेत जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने गावकऱ्यांनी संतप्त होऊन कंपनीची कोळसा वाहतूक बंद पाडली व कंपनीच्या दडपशाहीच्या विरोधात कंपनी परिसरात विजय क्रांती कामगार संघटनेच्या बॅनरखाली तीन दिवसीय साखळी उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान उपोषणाला प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार तहसीलदार अनिकेत सोनवणे, ठाणेदार बिपिन इंगळे, शेख जेरुद्दीन वरोरा, राष्ट्रीय काँग्रेस मजदूर जिल्हाध्यक्ष प्रवीण लांडगे, विलास परचाके सर्व प्रकल्पग्रस्त ,यांनी भेट देऊन गावकऱ्यांच्या मागण्यांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
0 comments:
Post a Comment