Ads

रेकॉर्ड वरील दोन गुन्हेगारांना तलवारीसह स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरने घेतले ताब्यात

चंद्रपुर :-दि. 20/03/2024 रोजी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिक्षक सा चंद्रपुर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑलआउट मोहीम व गुन्हेगार शोध मोहिम दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना म महेश कोंडावार, पो.नि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर व पथक यांना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन रामनगर व बल्लारपुर अंर्तगत दोन इसम सार्वजनिक ठिकाणी आम रोडवर धारधार नंगी तलावार हातात बाळगुण जनमाणसात दहशत निर्माण करीत आहेत. त्यावेळी पोनि महेश कोंडावार यांनी दोन वेगवेगळे पथक तयार करून एक पथक रामनगर व एक पथक बल्लारपुर येथे रवाना
The two criminals on record were taken into custody by the local crime branch Chandrapur along with the sword
पो.स्टे बल्लारपुर हददीतील पथक यांनी महारणा प्रताप वार्ड येथे हातात तलवार घेवुन फिरत असाणारा व लोकांनमध्ये दहशत निर्माण करणारा इसम नामे मनोज बिरमा डुलगज, वय-40 वर्षे, धंदा-बेकार, रा. महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपुर याला लपत छपत जावुन महर्षी वाल्मीकी चौक येथे छापा टाकला असता त्याचे जवळ एक लोखंडी धारधार तलवार कि.अं 500/- मिळुन आल्याने जप्त करण्यात आली. त्यास ताब्यात घेवुन पो.स्टे बल्लारपुर अप कं 274/2024 कलम 4,25 आर्म अॅक्ट सहकलम 135 (1), 37(3) म.पो.अधि. 1951 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पो.स्टे रामनगर हददीतील पथक यांनी इंदिरा नगर, बॉम्बे प्लॉट, चंद्रपुर येथे हातात तलवार घेवुन फिरत असाणारा व लोकांनमध्ये दहशत निर्माण करणारा इसम नामे शंकर काशीवेल खिल्लन, वय-21 वर्षे, धंदा-बेकार, रा. नंदी मोहल्ला बॉम्बे प्लॉट याला लपत छपत जावुन इंदिरा नगर, बॉम्बे प्लॉट, चंद्रपुर येथे छापा टाकला असता त्याचे जवळ एक लोखंडी धारधार तलवार कि.अं 3000/- मिळुन आल्याने जप्त करण्यात आली. त्यास ताब्यात घेवुन पो.स्टे रामनगर अप कं / 2024 कलम 4,25 आर्म अॅक्ट सहकलम 135(1), 37(3) म.पो.अधि. 1951 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

नमुद दोन्ही आरोपीत यांनी तलवार सारखे घातक शस्त्रे बेकदेशिरपणे ताब्यात बाळगुन मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर एमजी/कार्या-8/टे 3/साले/2003/1832 दि.14/03/2024 अन्वये कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्याचे दुष्टीने विवक्षीत कृतीना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंधक उपाय करणे तसे पुढील अगामी काळात लोकसभा निवडणुक व सन उत्सव असल्याने सदर आरोपीचे कृत्य शासकीय नियमाचे उल्लंघन करणारे असल्याने त्याचे विरूध्द वरील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर, अपर पोलिस अधिक्षक, रिना जनबंधु मॅडम यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर, सपोनि हर्षल ऐकरे, सपोनि विकास गायकवाड, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा सजंय आतकुलवार, पो.हवा अनुप डांगे व पोहवा मिलिंद चव्हाण, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment