Ads

एकमेकांच्या सहकार्याने विकासाच्या गाडीला गती देऊ Accelerate development by cooperating with each other

चंद्रपूर : ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा अंगी बाणून जाती-पातीचा विचार न करता शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, निराधार, बेरोजगार या सर्वांसाठी विविध विकासाचे प्रकल्प राबवून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या विकासात सर्वांचेच योगदान महत्वाचे आहे. एकमेकांच्या सहकार्याने देशाच्या विकासाच्या गाडीला अधिक गती देऊ, असे आवाहन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
Accelerate development by cooperating with each other
बुधवारी १० एप्रिल रोजी चंद्रपूर येथे आयोजित कुणबी समाज मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर मनोहर पाऊणकर, नामदेव डाहुले,किशोर टोंगे, हनुमान काकडे,, सुभाष गौरकार, अनील डोंगरे, उत्तम पाटील, पंकज ठेंगारे, अनिता भोयर, वनिता आसुटकर, शोभा पिदुरकर, राकेश गौरकार, मनोज मानकर, देवानंद थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘विश्वगौरव नरेंद्र मोदींजी गरीबों के मसिहा’ जात-पात-धर्म याचा विचार न करता केवळ राष्ट्रविकासासाठी काम करीत आहेत. जिल्ह्यातील जनतेसोबत संवाद साधण्यासाठी ते स्वत: चंद्रपुरात आल्याचेही ते म्हणाले. आपण वैद्यकीय उपचार घेताना किंवा दैनंदिन कामे करताना तसेच एव्हाना घर बांधताना जात पाहत नाही मग देशाच्या निर्माणात जात का पाहतो, असा सवाल करीत त्यांनी देशातील कुणबी समाजासह प्रत्येक समाज माझा आहे आणि त्यांच्या प्रगतीसाठी मी पूर्ण शक्तीने काम करेल, अशी ग्वाही दिली.  

कुणबी समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने तसेच समाजाच्या सुविधेसाठी अनेक कामे केल्याचा उल्लेखही यावेळी ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केला. समाजासाठी १५ कोटी रुपये निधीचा सभागृह  मंजूर केले असून गरीबांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी, महिला, रोजगार, आशा सेविका, दिव्यांग, ज्येष्ठ, रुग्णांना मदत केली आहे. यापुढेही कुणबी समाजाचा भाऊ म्हणून शेतकऱ्यांसाठी जीवन ओतून काम करेल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. 

समाज बांधवांचा जोश पाहून अनेक संकल्प करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही ते म्हणाले. कुणबी समाजाच्या उत्कर्षासाठी निरंतर काम करत राहिल, असा विश्वास व्यक्त करीत श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जाती-पातीचा विचार न करता देशाच्या विकासासाठी, राष्ट्राच्या प्रगतीसाठी मतदान करा, असे आवाहन देखील केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment