घाटंजी:-दरवर्षी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व बुद्धीला चालना मिळावी याकरिता अनेक परीक्षांचे आयोजन तथा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्या जाते त्यातील एक डॉक्टर होमी भाभा फौंडेशन मुंबई च्या वतीने MSAT-2 ही परीक्षा घेतली गेली यामध्ये विदर्भातून हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते त्यातच श्री समर्थ विद्यालयाच्या कुमारी शरयू चिव्हाने हिने सुद्धा ही परीक्षा दिली त्यात तिने विदर्भातून 32978 विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाचे व स्वतः चे नाव रोशन केले.
ती आपल्या यशाचे श्रेय आई व शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांना देते. याकरिता तिला प्राध्यापक सुनील बहादूरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री मधुसूदन चोपडे, सचिव श्री नरेश वैद्य मुख्याध्यापक श्री देवदत्त जकाते, उप मुख्याध्यापक श्री अमोल वैद्य, पर्यवेक्षक अरविंद मडावी यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले व तसेच सर्व शिक्षक तथा समाजामधून तिचे कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment