Ads

इको-प्रो मध्ये कोणतीही फूट नाही; संस्था 'एकजुट'There are no splits in the Eco-Pro; Organization 'united'

चंद्रपूर (प्रतिनिधी) : इको-प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी नुकतेच काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. त्यावर एका डिजिटल माध्यमातील चंद्रपुरातील न्यूज पोर्टलने कोणतीही शहानिशा न करता इको-प्रो मध्ये फूट पडल्याचे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे कोणतेही कारण नसताना कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर इको-प्रो संस्थेच्या सक्रिय कार्यकर्त्यांची बैठक रविवारी बैठक घेण्यात आली. इको-प्रो मध्ये कोणतीही फूट नाही; संस्था 'एकजुट' असल्याचे स्पष्ट करीत त्या वृत्ताचे खंडन करण्यात आले. दरम्यान खोटे व एकतर्फी वृत्त देणाऱ्या या पोर्टलमुळे संस्थेची नाहक बदनामी झाली आहे.
There are no splits in the Eco-Pro;  Organization 'united' 
इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी व्यक्तिगत निर्णय घेत काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारण्याची भूमिका घेतली. तसे व्यक्तिगत पत्र दिले, त्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी काँग्रेसमध्ये स्वागत करीत असल्याचे पत्र दिले. मात्र, शहरातील एका पोर्टलने कोणतेही शहानिशा न करता परस्पर वृत्त प्रकाशित करून बदनामी केली. कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संभ्रमामुळे आज रविवार, 21 एप्रिल रोजी इको-प्रो संस्थेचे जुने-नवे सर्व सदस्य यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेस सदस्यत्वासाठी लिहिलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले. सोबतच न्यूज पोर्टलमध्ये छापून आलेल्या बातमीचे सुद्धा वाचन करण्यात आले. यानुसार उपस्थित सर्व सदस्यांनी दोन्ही बातमी आणि पत्रातील तथ्यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार सदर पत्रामध्ये असं कुठलंही विधान करण्यात आलेलं नाही किंवा तसे काहीच लेखी देण्यात आलेले नाही, ही बाब स्पष्ट झाल्याने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सोबतच बंडू धोतरे यांनी आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केली.
त्यानुसार बंडू धोतरे हे व्यक्तिगत पातळीवर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. संस्थेचा कुठलाही पाठिंबा काँग्रेस किंवा उमेदवाराला देण्यात आलेला नाही. त्यानुसार संस्था मागील 20 वर्षापासून आपल्या कार्याचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून आहे. तसे पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्य यापुढेही निष्पक्षपणे सुरू राहणार आहे. बंडू धोतरे यांच्या काँग्रेस प्रवेशाने यावर कुठलाही फरक पडणार नाही. नेहमीप्रमाणे इको-प्रो संस्था आपली भूमिका घेताना सरकार कोणती आहे, कुणाची आहे? याचा विचार न करता आपल्या नेहमीच्या पद्धतीने कार्य करणार आणि भूमिका मांडणार आहे, असे सभेत स्पष्ट झाले.

संस्थेत कुठलीही फूट नसून, यापुढे सर्व सदस्य संस्थेसोबत राहून 'एकजूट' राहणार असल्याचे सर्वांनी एकमताने ठरविले. इको-प्रो संस्थेमध्ये अनेक विचाराचे, अनेक पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते व्यक्तिगत पातळीवर वेगवेगळ्या पक्षात काम जरी करत असले तरी, चंद्रपूर शहरासाठी किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नासाठी आम्ही सर्व एक आहोत आणि एक म्हणूनच आम्ही कार्य करत राहू अशी ग्वाही सर्वांनी दिली.

बैठकीत इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे यांच्यासह धर्मेंद्र लुनावत, ओम वर्मा, सुभाष शिंदे, अनिल अडगुरवार, बंडू दुधे, नितीन रामटेके, सुधीर देव, सचिन धोतरे, सुमित कोहळे, मनीष गावंडे, संजय सब्बनवार, विजय हेडाऊ, सुनील मीलाल, किशोर वैद्य, रवी गुरनुले, प्रकाश निर्वाण, सागर कावळे, राजू काहिलकर, योगेश गावतुरे, जितेंद्र वाळके, कपिल चौधरी, सुनील लिपटे, सनी दुर्गे, महेंद्र शेरकी आदी सदस्य उपस्थित होते.
.....
"काँग्रेस सदस्य म्हणून म्हणून माझी व्यक्तिगत आणि स्वतंत्र भूमिका घेतली आहे, त्याचा संस्थेची कुठलाही संबंध नाही. इको-प्रो ही संस्था नेहमीप्रमाणे कार्य करताना, प्रत्येक विषयावर आपली स्पष्ट आणि निपक्ष भूमिका असेल, तेव्हा या भुमिकेसोबत आम्ही कायम असणार आहे. संस्थेत पूर्वीपासून अनेक पक्षातील सदस्य असून ते सुद्धा संस्थेत कार्य करीत आहेत, संस्थेत कुठलाही संभ्रम नसून आम्ही एकजूट आहोत."
-बंडू धोतरे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment