भद्रावती (जावेद शेख): शहरातील शिवाजीनगर येथील नागरिकांतर्फे गुरूवारी महापुरुषांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, चक्रवर्ती सम्राट अशोक, आदिवासी लोकनायक बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी चिमुकल्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.
गुरूवारी सकाळी शिवाजीनगर येथील संकिसा बौध्द विहार येथे १५ वर्षे वयोगटापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला. यामध्ये प्रथम पुरस्कार तरूण लांजेवार, द्वितीय आर्या बोरकर, तृतीय अन्वर सावरकर, चतुर्थ तरूण पाल तर पाचवा पुरस्कार अन्वी वतन लोणे हिला मिळाला.
चित्रकला स्पर्धेकरिता परी बोरकर, देऊ वासमवार, शगुन लाडे, आरू लाडे, स्मायली दारूंडे, दिक्षा जुमडे, तनु जुमडे, तनु कोंडसकर, वरूण मेश्राम, पुष्कर गेडेकर, दादू रामटेके, अक्षता भागवत, श्रृती गाजर्लेवार, स्वरा कवाडे व ईतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांना पाटिल कोचिंग क्लासेसचे अजय पाटिल, अक्षय लोहकरे, संतोष भागवत, वैभव मानकर यांच्याकडून पारितोषिके देण्यात आली.
सायंकाळी सामुहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्चीचे आयोजनही करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत सातपुते, संकेत चिमूरकर, बादल बाराहाते, वैभव मानकर, प्रेम सपकाळ, सुरज बाराहाते, अनिकेत उपरे, कृत्तांत सहारे, प्रियांका जुमडे, रजनी सपकाळ, स्नेहा सातपुते, रजनीताई राहुलगडे, संगीता हिवाळे, प्रणिता चिंगलवार, स्मिता वानखेडे, उषा विजयकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शिवाजीनगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment