Ads

अवैधपणे रेतीचे उत्खनन करणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वरोरा तालुका प्रतिनिधी:शासकीय स्तरावर रेती घाटाचे लिलाव झालेले नसतानांही वरोरा तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदी पात्रातील तुळाणा व करंजी घाटातून रेतीचे अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी आज 26 एप्रिल रोज शुक्रवारला सकाळी ताब्यात घेतले असून या आरोपी जवळून जवळपास 35 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
Ten people who were illegally mining sand were detained by the police
येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी वरोरा पोलिसांच्या पथकासह वर्धा नदी च्या करंजी व तुळाणा घाटावर आज 26 एप्रिल रोज शुक्रवारला सकाळी 9 वाजता छापा टाकला व रेती या गौण खनिजाचे अवैद्य उत्खनन करणारे ५ ट्रॅक्टर सोबत जोडलेले ट्रॉलीसह ज्यात रेती भरून असलेले आणि ट्रॅक्टर धारक व चालकांनी एकमेकांसोबत घटनेदरम्यान संपर्क करणेकरीता वापरलेले 3 मोबाईल फोन असा एकूण 35,38,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणात ट्रॅक्टर चालक आणि मालक- नितेश वामन पिंगे, मुकेश चांदेकर, विजय आनंदराव मारेकर, राजा थैम, विकास जानकीराम पंधरे, आसिफ थैम, भालचंद्र महादेव पिंपळशेंडे, राजु गंधारे, संजय मारोती खांडेकर आणि विक्की गंधारे, अशा एकूण १० आरोर्पीविरूध्द कलम ३७९,३४ भा.दं. वि. सहकलम ४८ महाराष्ट्र महसुल अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे सदर रेती घाट रेती उपसा करणेकरीता शासन स्तरावरून जिल्हाधिकारी, यांचे आदेशाने लिलाव झालेले नाही. तरी सुध्दा यातील आरोपींनी संगणमताने मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टरसोबतचे ट्रॉलीमध्ये भरतांना मिळून आलेले आहेत.
तसेच रेती तस्करांकडुन रात्री अपरात्री रेती भरलेले ट्रॅक्टर लोकवस्तीतून भरधाव घेवून जात असल्याने नदी पात्राची व रस्त्यांची दुरावस्था होत असल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत व स्वतः पुढे येवून रेती तस्करांविरुध्द कार्यवाही करण्यास सहकार्य करीत आहेत. अशाच प्रकारे नागरिकांचे सहकार्यातुन सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी कायदेशिर कार्यवाही केलेली आहे.
सदर कार्यवाही करीता सपोनि विनोद जांभळे तसेच किशोर बोढे, दिपक मोडक, विशाल राजुरकर, विठ्ठल काकडे आणि नितीन तुराळे अशा पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे. सदर प्रकरणात पुढील कार्यवाही करीता अहवाल महसूल विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे भविष्यात रेती तरकरांकडून अवैद्यरित्या रेती उत्खनन किंवा वाहतुक केल्यास कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, अशी चेतावणी पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment