Ads

घाटंजी नायब तहसीलदाराचे जुलमी कारभारविरोधात राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगाकडे प्रकरण दाखल : गिलानी कॉलेज परिसरात युवकांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे प्रकरण

घाटंजी प्रतिनिधी : २४ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान शहरातील काही युवक जेवण करून मुख्य रस्त्याने फिरत असताना, येथील गिलानी कॉलेज चौक लगत असलेल्या एका दुकाना लगत एकत्र येऊन गप्पा गोष्टी करत होते. त्यावेळी घाटंजी चे निवासी नायब तहसिलदार यांनी जमलेल्या युवकांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून, खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आलेली आहे.
A case has been filed with the State Minorities Commission against the tyranny of Ghatji Naib Tehsildar: A case of caste-based abuse of youth in Geelani College area.
विशेष म्हणजे या पूर्वीही वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या निवासी नायब तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी अशाच प्रकारे बळजबरीने रामपूर येथील किरण पारेकर या युवकास लाठीने मारहाण केल्या प्रकरणी शेलवटकर यांचे वर घाटंजी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला होता...

महसूल विभागात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती असलेल्या या अधिकाऱ्याने त्याचे पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग केल्याच्या अशा अनेक चर्चा घाटंजी तालुका व परिसरात आहेत.

यात २४ एप्रिल रोजी घडलेल्या घटने नंतर तर शहर व परिसरात प्रशासना विषयी चीड निर्माण झालेली आहे....

_हम करे सो कायदा_ या पद्धतीने वागणाऱ्या या अधिकाऱ्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून, फौजदारी कारवाई सोबतच या नायब तहसिलदाराला सेवेतून काढून टाकण्याची मागणी राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे, अल्पसंख्यांक आयोगाकडे, वरिष्ठ महसूल व पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे...
संबंधित अधिकाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यास, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६-३ अंतर्गत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती यावेळी माध्यमांशी बोलताना तक्रारदार, मुजम्मील जफर पटेल यांनी दिलेली आहे.
सोबतच एका महत्त्वाच्या पदावर असलेल्या या अधिकाऱ्याने अशा प्रकारची केलेली वर्तणुक ही समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले...

महत्त्वाच्या पदावरील प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याकरिता एक वेगळे प्रकरण वरिष्ठांकडे दाखल करणार असल्याचा इशारा दिलेला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment