Ads

उद्धव ठाकरे यांची जिल्हाप्रमुखांना शाब्बासकीची थाप...!

भद्रावती तालुका प्रतिनिधि जावेद शेख: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असताना चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी भेट घेऊन चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा आढावा तसेच दोन वर्षातील पक्षसंघटनेचा कार्यअहवाल सादर केला.

Uddhav Thackeray's congratulation to the District Chief...!
महाराष्ट्रात सगळीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच पहिल्या टप्प्यामध्ये चंद्रपूर लोकसभेची निवडणूक संपन्न झाली आहे. विदर्भातील लोकसभा निवडणुकीचा तसेच प्रचार दौऱ्यानिमित्त आलेले शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी भेट घेऊन नुकत्याच पहिल्या टप्प्यामध्ये संपन्न झालेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा आढावा तसेच दोन वर्षातील पक्षसंघटनेचा कार्यअहवाल जिल्हासंपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर केला.

याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांच्या कार्याची स्तुती करत शाब्बासकीची थाप दिली. तसेच आगामी विधानसभा, जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी कामाला लागा असा आदेश दिला. यावेळी उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड,जेष्ठ शिवसैनिक तथा शिवदुत बंडू डाखरे, युवासेना जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव, युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख गणेश चीडे, सोहेल अली व आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment