Ads

bismuthओरोविंदो कोळसा खाण ओबीसी प्रकल्पग्रस्तांना न्याय दिल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही पानवडाळा येथील महापंचायतमध्ये हंसराज अहीर यांचा निर्धार

चंद्रपूर- ओरोबिंदो रिआलिटी इन्फ्रास्ट्रक्चर लिमी च्या पानवडाळा, टाकळी, जेना, बेलोरा, डोंगरगांव खडी, किलोनी, कान्सा, शिरपूर उत्तर व दक्षिण कोळसा खाणी करीता होणाऱ्या भूसंपादन, पूनर्वसन व रोजगार विषयक मागण्यासंदर्भात ओबीसी प्रकल्पग्रस्तांनी बोलाविलेल्या महापंचायत व संवाद सभेला प्रमुख उपस्थिती दर्शवित ही महापंचायत प्रकल्पग्रस्तांच्या न्याय लढ्याचे रणशिंग फुंकणारी असून संबंधित ओबीसी व अन्य प्रकल्पग्रस्तांना त्यांचे न्यायहक्क मिळवून दिल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही असा निर्धार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला
Bismuth Orowindo Coal Mine OBC Project Victims There will be no rest without justice Determination of Hansraj Ahir in Panwadala Maha Panchayat

टाकळी, जेना, बेलोरा कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या भद्रावती तालुक्यातील पानवडाळा येथे दि. 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या संवाद सभेत उपस्थित शेकडो प्रकल्पग्रस्तांना संबोंधित करतांना ते बोलत होते. या संवाद सभेला रमेश राजुरकर, पानवडाळाचे सरपंच प्रदीप महाकुलकर धनंजय पिंपळशेंडे, अशोक हजारे, विजय वानखेडे,नरेंद्र जीवतोडे, प्रशांत डाखरे, पवन एकरे, राकेश तालावार, आकाश वानखेडे, प्रदिप मांडवकर, विजय ढेंगळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हंसराज अहीर यांनी प्रकल्प्रग्रस्तांच्या न्यायोचित मागण्या व समस्या जाणून घेतल्या त्याबाबत उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केले. आपल्या मागण्यांसाठी आक्रमकतेने समस्यांचे निराकरण करण्याची तयारी करण्याची आवश्यकता असल्याचे अहीर यांनी यावेळी सांगीतले. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला, निर्धारीतकालावधीत जमिनीचे संपादन बेलोरा गावाचे योग्य ठिकाणी पूनर्वसन हाय पाॅवर कमिटीनुसार स्थानिक प्रकल्पग्रस्त युवकांना रोजगार व प्रकल्पाकरीता लागणारी संपूर्ण 936 हे. जमिन ठराविक कालावधीमध्ये संपादित करुन भरीव मोबदला मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास अहीर यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिला.
या महापंचायतीला ईश्वर उताने, भाऊराव महाकुलकर, पंढरी पिंपळकर, जितू पिंपळकर, धराज आसेकर, नितेश बोथले, गुणवंत उताने, अनिल चिकटे, मंगेश लांडगे, निलेश उताने, लहू बोथले, कवडूजी भोयर, सचिन महाकुलकर, मोहन आसेकर, प्रमोद आसेकर, गजानन उताने, महेश उताने, सुरज झिलपे, विकास घोसरे, पंढारी ताजने, सौ प्रिती घोसरे, सौ सविता महाकुलकर, सौ सुवर्णा महाकुलकर, सौ रजपी आस्वले, पोलिस पाटील सौ सुषमा उताने, सौ छाया पिंपळकर, सौ कल्पना घोसरे, सौ दिपाली काळे, सरंपच डोंगरगांव खडी सौ मनिषा तुरानकर, हेमंत धानोरकर, राहुल सोनेकर, विलास परचाके, प्रशांत मत्ते, प्रवीण देऊरकर, लेडांगे यांचेसह पानवडाळा, टाकळी, जेना, बेलोरा, डोंगरगांव खडी, किलोनी, कान्सा, शिरपूर येथील बहुसंख्य ओबीसी प्रकल्पग्रस्त बांधव उपस्थित होते.
यावेळी महापंचायतीला उपस्थित सरपंच व प्रकल्पग्रस्तांनी न्यायाकरीता आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment