घुग्घुस- अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली असून प्रशासनाच्या वतीने नुकसान ग्रस्त घरांची पाहणी करुन पंचनामे केल्या जात आहे. हे काम अधिक गतिशील करुन नुकसाण होउनही नोंद करण्यात न आलेल्या घरांच्या नोंदी करत त्याचेही पंचनामे पुर्ण करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना केल्या आहेत.
रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील घुग्घूस येथे भेट देत येथील नुकसान ग्रस्त भागाची अधिका-यांसह पाहणी केली. यावेळी पावसाने घर कोसळलेल्या पिढीत कुटुंबांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आर्थिक मदत केली आहे. यावेळी नायब तहसीलदार सचिन खांडरे, मंडळ अधिकार विनोद गनफाडे, तलाठी मनोज कांबळे, यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घूसचे नेते इमरान खान, प्रेम गंगाधरे, मुन्ना लोढे,यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस महिला संघटिका उषा आगदारी, सुरेखा तोडासे, वनिता निहाल, विना गुचाई, कामिनी देशकर, नविन मोरे, मयुर केवल, राजु सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
मागील आठवड्यात संपूर्ण विदर्भासह चंद्रपूरात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. परिणामी नागरिकांची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने सदर घरांचे पंचनामे करण्यात येत आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर शहरात नुकसान झालेल्या घरांची यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी पाहणी करत आर्थिक मदत केली आहे.
दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घुस येथील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिका-यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस येथील अमराई वार्डातील मोरेश्वर बेसेकर, साधना पाझारे, गजानन गाडगे, पूष्पा निघाद, रत्नमाला बि-हाडे, राघो काळबांधे, शांता परशिवे, नामदेव किन्नाके, शारदा आइलवार, माधुरी मडावी यांच्या घरांची पाहाणी केली. सदर सर्व घरांचा पंचनामा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. या पिढीत कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी या करिता जलद गतीने काम करण्याच्यास सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्यात. तसेच येथील अनेक घरांची नोंद झाली नसल्याची तक्रार यावेळी स्थानिकांनी केली. सदर सर्व घरांची यादी तयार करुन त्याही घरांचे पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
0 comments:
Post a Comment