घाटंजी तालुका प्रतिनिधी :-संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक 19 एप्रिलला होत आहे, या लोकसभा क्षेत्रात इंडिया आघाडी व महायुती सोबतच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह, अपक्ष उमेदवार सुद्धा उमेदवारी लढवीत आहे.
या मतदार संघात ओबीसी समाज हा बहुसंख्येने असून या लोकसभा क्षेत्रात माळी समाजाचे तीन लाखाच्या वर मतदार आहेत.मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कडून मा.राजेंद्र महाडोळे असल्याने भाजपच्या उमेदवाराला पराभूत व्हावे लागले. या निवडणुकीत मात्र वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसचा उमेदवार पराभूत होऊ शकतो. अशा अटीतटीच्या परिस्थितीत महाराष्ट्र माळी मिशनची भूमिका निर्णायक ठरणार आहे. एस सी , एस टी, सह ओबीसी समाजाचे हित जो पक्ष किंवा उमेदवार जोपासण्यास सक्षम आहे, त्या उमेदवाराच्या पाठीशी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील माळी समाज उभा राहणार आहे. याबाबत महाराष्ट्र माळी मिशन कामाला लागले असून महाराष्ट्र माळी मिशनचे राजकीय समिती प्रमुख मा. वासुदेवराव चौधरी यांच्या मार्गदर्शनात येत्या दोन दिवसात घाटंजी येथे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, मूल ,बल्लारपूर, जिवती, कोरपना, राजुरा, वणी, मारेगाव, झरी जामणी, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी इत्यादी तालुक्यातील माळी समाजाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते यांची सभा होत आहे. या सभेमध्ये माळी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र माळी मिशनचे चंद्रपूर लोकसभा समन्वयक पांडुरंग निकोडे यांनी केले आहे . अशी माहिती महाराष्ट्र माळी मिशनचे आर्णी विधानसभा समन्वयक दिनेश गाऊत्रे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0 comments:
Post a Comment