Ads

लोकसभा निवड‌णुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग निकोडे यांचा राजीनामा

घाटंजी (तालुका प्रतिनिधी):-गेल्या पाच वर्षा पासून संपूर्ण जिल्हयात वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाच्या माध्यमातून शासन व प्रशासनाला वठणीवर आणणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पाडुरंग निकोडे यांनी लोकसभा निवडणुकी च्या अनुषंगाने केंद्रीय व राज्य नेतृत्वाने घेतलेले निर्णय न पटल्याने आपल्या पदाचा राजीनामा जिल्हयाचे अध्यक्ष यांच्याकडे पाठविला आहे, पांडुरंग निकोडे हे ओबीसी चे आंदोलक असून महाराष्ट्र माळी मीशन चे चंद्रपूर लोकसभा समन्वयक आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात माळी समाज व ओबीसी समाज बहुसंख्येने असल्याने ओबीसी च्या हक, न्याय व अधिकारासाठी राजीनामा दिल्याचे कळते.
Vanchit Bahujan Aghadi District Vice President Pandurang Nikode Resigns Ahead of Lok Sabha Elections -
लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 लोकसभा क्षेत्रापैकी फक काँग्रेसच्याच 7 उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा देण्याचा निर्णय चुकीचा आहे, जर काँग्रेसच्या राज्यातील संपूर्ण उमेद‌वाराला पाठींबा दिला असता तर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या पाठींब्याने कॉग्रेसच्या उमेदवार निवडून आल्या असत्या. परंतु या ठिकाणी वंचित चे उमदेवार श्रीमान राजेश बेले असल्याने फुले, शाहू, आंबेडकर विचार धारेच्या मतामध्ये विभागणी होऊन भाजप प्रणित उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे. काही दिवसापूर्वी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरु होता. जे मनोज जरांगे मराठा आरक्षणावर राज्यात मोठे आंदोलन उभारून ओबीसीच्या 27% आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे म्हणतात व सगेसोयरे ची अंमलबजावणी, मराठ्यांना कुनबी प्रमाणपत्राचे वाटप हा ओबीसीच्या न्याय, हक्क व अधिकारावर गदा आणणारा आहे.

आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी यापूर्वी मनोज जरांगे यांना पाठींबा देतांना ओबीसीचे ताट वेगळे व मराठा समाजाचे ताट वेगळे अशी भुमीका घेतली होती. हा निर्णय योग्य होता. परंतू मनोज जरांगे हे त्याच्या मुजोरीने ओबीसी तूनच आरक्षण घेण्याच्या मुद्द्यावर ठाम अकल्याने, सगे सोयरे ची अंमलबजावणी, मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र वाटप यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर संपूर्ण मराठा समाजाचे वर्चस्व निर्माण होणार आहे. सध्या मनोज जरांगे व वंचीत बहुजन आघाडीच्या राजकीय आघाडीमुळे राज्यातील ओबीसी समाज दुखावला जात आहे. याच निर्णयामुळे दुखावून पांडुरंग निकोडे यांनी राजीनामा दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment