Ads

आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी ३० जणांवर गुन्हा दाखल

वरोरा (सादिक थैम ):-दि.१२/०५/२४ रोजी आय.पी.एल. मॅचवर बेटींग करून, हार-जीतचा जुगार खेळणारे आरोपी विरूध्द कारवाई करणेकरीता, श्रीमती नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वरोरा यांनी, गोपनीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे, पो.स्टे. वरोरा येथील स.पो.नि. विनोद जांभळे, व पोलीस स्टाफसह, गुघाने यांचे घरी, बावने ले आउट, साई मंगल कार्यालयाच्या बाजुला, वरोरा येथे आय.पी.एल.वर सटटा खेळणारे आरोपीवर रेड केली असता,
Case registered against 30 people in IPL betting case
एक खोली मध्ये १) ओमप्रकाश देविदास जाधव, व २) आशिष गजानन जाधव, रा. वरोरा हे लॅपटॉप व मोबाईलच्या साहाने, चिन्नस्वामी स्टेडीयम, बॅगलोर येथील ग्राउंडवर, चालु असलेल्या दिल्ली कॅपिटल विरूध्द रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोर या इंडीयन प्रिमीयर लिगच्या (आय.पी.एल.) लाईव्ह मॅचवर, पैशाची बाजी लावुन, व मोबाईलवरून, ग्राहकांकडुन मॅचचे सौदे घेउन, हारजितचा जुगार खेळ खेळीत (सटट्टा लावतांना) असतांना मिळुन आले. वरून घटनास्थळावरून १० मोबाईल, ०१ लॅपटॉप, ०१ पेन ड्राईव्ह, ०२ कॅलक्युलेटर, एक अॅक्टीवा मोपेड, व इतर साहीत्य तसेच नगदी रक्कम ३२,७४० रू. असा एकुन ०२,६७,४१० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व आरोपी नामे १) ओमप्रकाश देविदास जाधव, वय-४३वर्ष, २) आशिष गजानन जाधव, वय-२७ वर्ष दोन्ही रा. सुभाष वार्ड, आशिर्वाद मंगल कार्यालय वरोरा, पाहीजे आरोपी ३) मिनाज शेख रा. वणी जि. यवतमाळ ४) जम्मु शेख रा.वणी जि.यवतमाळ ५) रितीक जाधव रा. वरोरा. ६) अमोल डांगरे रा. वरोरा ७) अमोल टिपले रा. वरोरा ८) बादल लाखा रा. वरोरा ९) भुषण दिक्षीत रा. वरोरा १०) डॉ. काळे रा.वरोरा ११) अजिंक्य नरडे रा. वरोरा १२) अमित घोडमारे रा. वरोरा १३) समीर पाटील रा. वरोरा १४) सुरज रा. बुटट्टीबोरी नागपुर. १५) राजेश तुपकर रा. वरोरा १६) रवि गभणे रा. वरोरा १७) राहुल टिपले रा. वरोरा १८) पिंन्टु तडस रा. वरोरा १९) पिंन्टु टोंगे रा. वरोरा २०) प्रसाद खडसान रा. वरोरा २१) कुणाल चिमुरकर रा. वरोरा २२) मोहीत शर्मा रा. वरोरा २३) अनिल पाटील रा. वरोरा २४) पंकज वैद्य रा. वरोरा २५) अमित भगत रा. वरोरा २६) गौरव रा. वरोरा २७) रणजित रा. वरोरा २८) अतुल वानखेडे रा. वरोरा २९) मंगेश रा. भद्रावती ३०) मंगेश रा. वरोरा यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन, पुढील तपास सपोनि विनोद जांभळे पोस्टे वरोरा हे करत आहेत.

सदर कारवाई मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, श्रीमती. रिना जनबंधु, अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर. यांचे मार्गदर्शनाखाली, श्रीमती. नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक, उपविभाग वरोरा, सपोनि विनोद जांभळे, पो.अं. दिपक दुधे, दिपक मेश्राम, रिषभ काटकर, जितेंद्र राजुरकर, मोहन निषाद, राजु लोधी, विशाल राजुरकर, प्रशांत बावणे, चालक हेपट यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment