Ads

जिल्ह्यातील अल्पवयीन वाहणचालकांवर कारवाई करा. शिवसेना शिंदे गटाचे पोलीस अधिक्षकांना निवेदन.

भद्रावती.(जावेद शेख):-काही दिवसांपूर्वी पुण्यात एका अल्पवयीन वाहनचालकाने बेजबाबदारपणे चारचाकी वाहण चालवून दोन निरपराध नागरिकांचा बळी घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातही अल्पवयीन दुचाकी तथा चारचाकी वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.त्यामुळे भविष्यात येथे कोणतिही अनुचीत घटना घडू नये यासाठी त्वरीत दखल घेऊन जिल्ह्यात एक विषेश मोहिम राबवून अल्पवयीन वाहणचालकांवर कठोर कारवाई करावी व जिल्ह्यातील दारु तथा बारमालकांना अल्पवयीन युवकांना दारु विक्री न करण्याची सुचना द्यावी यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधिक्षकांना एक निवेदन देण्यात आले आहे.
Take action against minor drivers in the district.
Statement of Shiv Sena Shinde faction to Superintendent of Police.
अल्पवयीन वाहनचालकांकडून जिल्ह्यत बेजबाबदारपणे दुचाकी व चारचाकी वाहणे चालविण्याने याआधी अनेक अपघात घडले आहे. या अपघातांमधे अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेल्याची उदाहरणे आहेत.या बेलगाम वाहणधारकांमुळे पादचारी नागरीकांत भिती निर्माण झाली आहे.याशिवाय बार व दारु दुकान मालकांकडून अल्पवयीन युवकांना दारु विक्री केल्या जात असल्याचे आढळून येत आहे.या प्रकारावर त्वरित आळा घालून अल्पवयीन वाहणचालकांवर कारवाईची मोहीम सुरु करावी अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे.या गंभीर विषयाची त्वरीत दखल न घेतल्यास शिवसेनेतर्फे जिल्ह्यात सर्वत्र जन आंदोलन ऊभारण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.निवेदन सादर करतांना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर, जिल्हा प्रमुख बंडू हजारे, विधानसभा संघटक नरेश काळे,चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी, अरविंद धिमान आदी ऊपस्थीत होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment