चंद्रपुर :-चंद्रपुर जिल्हयात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमी असल्याने अभिलेखावरील अउघड गुन्हे तात्काळ उघडकिस आणणेबाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शना खाली शाखेचे पथकांना आदेशीत केले होते.
The Local Crime Branch, Chandrapur has revealed the crime of motorcycle theft by criminals in an inn
पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात प्रभावी पेट्रोलींग करून मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याचे निर्देश दिले होते. दिनांक 23/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गोपनीय बातमीदाराचे माहीती वरून स्थागुशा. येथिल अधिकारी व कर्मचारी यांनी पो. स्टे. कोरपना हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना माहिती मिळाली की, मोटार सायकल चोरी करणारा प्रदिप उर्फ पत्या संजय शेरकुरे वय 29 वर्षे रा. धोपटाळा (पारधीगुडा) ता. कोरपना जि. चंद्रपूर यांचे कडे चोरीच्या मोटार सायकली घरी लपवून ठेवल्या आहे अशा माहिती वरूण त्याचे घरी गेलो असता त्याचे घरासमोर लपवून ठेवलेल्या मोटार सायकल, मोपेड गाडी मिळून आल्या 1) हिरो स्पेल्डर मो. सा. क. MH-34-AU-7229 कि. 25,000/- रू व इतर 2) हिरो होंन्डा स्पेल्डर मो. सा. क. MH-29-J- 1879 कि. 25,000/- रू 3) एक होंन्डा डिओ मोपेड नंबर नसलेली कि. 35,000/- रू. असा एकूण किं. 85,000/- रू चा माल मिळून आल्याने जप्त करण्यात आला. त्यास सदर मोटार सायकल चोरी बाबत विचारपूस केली असता त्याने सदर मोटार सायकली पो. स्टे. तळोधी बाळापूर, चंद्रपूर शहर, कोरपना हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले.
सदर कर्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, स्वामीदास चालेकर पोशि. प्रशांत नागोसे, चालक पोशि. मिलींद टेकाम यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment