Ads

24 तासात खुनाच्या आरोपीला अटक

वरोरा प्रतिनिधी :-26 जून 2024 रोजी निर्घृण हत्येचे हृदयद्रावक प्रकरण समोर आले. ज्यामध्ये वरोरा येथील आनंदवन येथील आरती दिगंबर चद्रवंशी (२४) हिची घरातच हत्या करण्यात आली होती.
Accused of murder arrested in 24 hours
घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ वरोरा पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा क्र.५१८/२०२४ नोंदवून तपास सुरू केला. वरोरा पोलिसांनी तंत्रज्ञान व ह्युमन इंटेलिजन्स च्या आधारे 24 तासाच्या आत अज्ञात आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे समाधान माळी रा.चोपडा, जळगाव ह. मु. वरोरा याला ताब्यात घेऊन, विचारपूस केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. वरोरा पोलीस हत्येची पद्धत आणि हेतू शोधत आहेत.
समाधान हा स्वतःचा उपचार आनंदवनात करण्यासाठी आला होता, विशेष म्हणजे उपचार घेत तो केअर टेकरचे कामही करायचा.
आनंदवणाच्या या आश्रमात समाधान व आरतीचे प्रेमसंबंध सुरू झाले, 6 महिने दोघेही प्रेमाच्या सागरात बुडाले होते, मात्र त्यानंतर आरती चे लक्ष भरकटले व दुसऱ्या युवकासोबत तिचे प्रेम संबंध जुळले.
याची चाहूल समाधान ला लागली, त्यानंतर दोघात वाद सुरू झाले, समाधान आरती ला म्हणाला की जर तुला माझ्या प्रेमाची गंमत करायची होती तर प्रेमात आणाभाका कशाला घ्यायला लावल्या, यावरून दोघांचे वाद झाले. राग अनावर न झालेल्या आरोपीने आपल्या प्रियशीची हत्या केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, सहायक पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपविभाग वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे, एस. पो.ना.विनोद जांभळे, पो.कॉ. उपनिरीक्षक धीरज मसराम, पोहेका दिलीप सूर, दीपक दुधे, किशोर बोडखे, पोलीस अंमलदार मोहन निषाद, शशांक बडमवार, महेश गावतुरे, रोशन तामशेडवारकेले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment