सादिक थैम वरोरा:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात नवीन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीला येथील ज्येष्ठ शिवसैनिक व विद्यमान जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी आक्षेप घेतला असून ही नियुक्ती परत घ्यावी या मागणीसाठी ते आपल्या शेकडो सहकाऱ्यांसोबत मुंबईला रवाना झाले आहेत. ही नियुक्ती रद्द न केल्यास वरोरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकासह आपण राजीनामा देऊ व सैनिक म्हणून पक्षात कार्य करत राहणार असून वेळ पडल्यास आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा आज सायंकाळी येथील शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी केली
Shiv Sainiks angry over appointment of new district chief*
चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र येत असून यापूर्वी तीन तीन विधानसभा क्षेत्रासाठी दोनच जिल्हाप्रमुख नेमलेले होते. परंतु काल 26 जून रोज बुधवारला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर व वरोरा विधानसभा क्षेत्रासाठी रवींद्र शिंदे यांची नेमणूक करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे वरोरा तालुक्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत.
यापूर्वी वरोरा,चिमूर व ब्रह्मपुरी या तीन विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख म्हणून मुकेश जीवतोडे व चंद्रपूर, बल्लारशा, राजुरा या तीन विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाप्रमुख म्हणून संदीप गि-हे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. या नवीन आदेशानुसार मुकेश जीवतोडे यांच्याकडील वरोरा तर संदीप गि-हे यांच्याकडील चंद्रपूर विधानसभा क्षेत्र काढून या दोन क्षेत्राचे प्रमुख म्हणून सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते व उबाटाचे वरोरा विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांची नेमणूक केल्याचे आदेश आल्यामुळे तालुक्यातील शिवसैनिकात असंतोष पसरला आहे.
संगनमताचे व पैशाचे राजकारण करून यापूर्वीही भद्रावती - वरोरा क्षेत्रावर अन्याय करण्यात आला असून या पूर्वीच्या जिल्हा प्रमुखांना याच प्रकारे डावलण्यात आल्याचे सांगून ही नियुक्ती करतांना संपर्कप्रमुख व या विधानसभा क्षेत्राचे प्रभारी आमदार भास्कर जाधव यांनाही देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नियुक्त्या करण्यामागे संजय राऊत व त्यांचे बंधू सुनील राऊत यांची महत्त्वाची भूमिका असून ही नियुक्ती परत न घेतल्यास क्षेत्रातील वरोरा विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांसह आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा मुकेश जीव तोडे यांनी या पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेस मधून सेनेत आलेले रवींद्र शिंदे यांचे पक्षाशी कोणत्याही प्रकारचे देणे घेणे नसून ते पदाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन नियुक्त्या करत असल्याचे करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
रवींद्र शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले असल्याने त्यांची या पदावर केलेली नेमणूक रद्द करण्याची मागणी करत अशा प्रकारे केलेल्या नियुक्त्या या प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय करणाऱ्या असल्याचेही मत मुकेश जीवतोडे यांनी व्यक्त केले.
शिवसेना कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला शेकडो महिला व पुरुष शिवसेनिक उपस्थित होते.पत्र परिषदेनंतर हे सर्व शिवसैनिक बसेसने मुंबईकडे रवाना झाले.
0 comments:
Post a Comment