भद्रावती जावेद शेख :-शहरातील श्रीकृष्ण नगर येथील हनुमान मंदिरातील हनुमान मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची घटना दिनांक 26 रोज बुधवार ला सकाळी आठ वाजता उघडकीस आली.सदर विटंबना प्रकरणी आरोपी रोहित लिपटे वय 24 वर्षे, राहणार श्रीकृष्ण नगर याचे वर दिनांक दिनांक 27 रोज गुरुवारला दुपारी दीड वाजता गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
Desecration of Hanuman idol in Bhadravati, accused arrested.
सदर आरोपीने सदर हनुमान मंदिरातील हनुमान मूर्तीचे वस्त्र काढून ते जाळले व त्याची राख मूर्तीला फासून मूर्तीची विटंबना केली. घटना उघडकीस आल्यानंतर वार्डातील काही नागरिक घटनेच्या दिवशी तक्रार करण्यासाठी भद्रावती पोलीस स्टेशनला गेले असता तक्रार घेण्यात आली नाही.त्यानंतर संताप्त झालेल्या बजरंग दल भद्रावती,बजरंग दल चंद्रपूर, बजरंग दल वरोरा, हनुमान जन्मोत्सव समितीचे कार्यकर्ते व वार्डातील नागरिक व महिला दिनांक 27 ला दुपारी एक वाजता भद्रावती पोलीस स्टेशनवर धडकल्यानंतर या घटना प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. दरम्यान सदर हनुमान मूर्तीला स्वच्छ करून व शेंदूर लावून पूजा पाठ करण्यात आले.घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment