(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही ग्रामपंचायत येथे उपसरपंच पद हे काही कारणास्तव अविश्वास आल्याने उपसरपंच पद रिक्त झाल्यामुळे आज दिनांक 27/06/2024 रोजी गुरुवार ला गुंजेवाही ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदाकरता निवडणूक घेण्यात आले
निवडणुकी करता अध्याशी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी रवींद्र चिडे यांची नेमणूक करण्यात आली होती. चिडे यांनी आज सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय गुंजेवाही येथे उपसरपंच पदाकरता निवडणूक ग्रामसेवक तसेच तलाठी व गुंजेवाही ग्रामपंचायतचे संपूर्ण सदस्य यांच्या उपस्थितीत घेण्यात आले उपसरपंच पदाकरता 1)होमकांत नीलकंठ वालदे व2) शालीनी तातेश गुरनुले हे दोन नामनिर्देशक पत्र सादर केले होते. निवडणुकीच्या संबंधित कार्यक्रमा दरम्यान नियोजित वेळेत होमकांत नीलकंठ वालदे या उमेदवाराने उपसरपंच पदाकरता नामनिर्देशक पत्र माघार घेतले त्यामुळे शालीनी तातेश गुरनुले या महिला उपसरपंच पदाकरता अविरोध निवडून आल्या. निवडणुकीच्या कार्यक्रम दरम्यान ग्रामपंचायत गुंजेवाही चे सदस्य हजर होते तसेच गुंजेवायचे तलाठी पंकज नागपुरे ग्रामसेवक हे उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment