Ads

आनंदवन आश्रमात 25 वर्षीय तरुणीची हत्या

वरोरा: वरोरा तालुक्यातील बाबा आमटे यांचे कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेलं आनंदवन आश्रमात 25 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरती चंद्रवंशी असं मृत तरुणीचं नाव आहे. ही घटस्फोटित तरुणी कै. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये आई-वडिलांसोबत वास्तव्याला होती.
25-year-old girl killed in Anandavan Ashram
तिचे वडील दिगंबर चंद्रवंशी दिव्यांग (अंध) असून गेल्या 40 वर्षांपासून ते आनंदवन येथे राहतात. 26 जून रोजी ते आपल्या पत्नीसह उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते. काल रात्री उशिरा घरी आल्यावर त्यांना घराच्या बाथरूममध्ये आरतीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला. मृत तरुणीच्या गळ्यावर घाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.काल रात्री वरोरा पोलिसांनी उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे शवविच्छेदनासाठी आणले होते. 
आज दुपारी 3:15 च्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले.
या घटनेनंतर आनंदवनात खळबळ उडाली आहे. वरोरा तालुक्यातील आनंदवन हा आश्रम बाबा आमटेंनी केलेल्या कामासाठी ओळखला जातो. बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी हा आश्रम उभा केला. आतापर्यंत या आश्रमाने हजारो कुष्ठरोगी आणि वृद्धांना आसरा दिला. अशा सामाजिक काम करणाऱ्यांची आश्रमात एका तरूणीचा खून होणं ही बाब धक्कादायक असून पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment