Ads

हा आघाडीच्या कार्यकर्त्यांचा व मतदारांच्या विश्वासाचा विजय: खा. प्रतिभा धानोरकर.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-एवढ्या मोठ्या व्यापक असलेल्या लोकसभा क्षेत्रात महाविजय मिळविणे सहज शक्य नव्हते. मात्र महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत व मतदार संघातील मतदारांचा विश्वास या बळावर हा प्रचंड विजय मिळवणे सहज शक्य झाले. हा विजय माझा नसून तो महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा व मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाचा विजय असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर -वनी -आर्णी लोकसभा मतदार क्षेत्राच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.
This is a victory for the leading workers and the trust of the voters: MP. Pratibha Dhanorkar.
सर्वप्रथम ही रॅली बाळासाहेब प्रवेशद्वार पासून भद्रावती येथील डॉ. आंबेडकर चौकात आयोजित एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रतिभा धानोरकर, वच्छला धानोरकर, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, भास्कर ताजने, काँग्रेसचे जिल्हा महासचिव धनंजय गुंडावार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर ,राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, सरपंच संघटनेचे नयन बाबाराव जांभुळे, सुमित मुळेवार,काँग्रेस महिला शहर अध्यक्षा सरिता सूर, संध्या पोडे, रेखा कुटेमाटे, प्रफुल चटकी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रथम शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांची ढोल -ताशांच्या निणादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य विजयी रॅली काढण्यात आली. सदर रॅली डॉ. आंबेडकर चौकात पोहोचल्यानंतर रॅलीचे भव्य जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांतर्फे प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली. मतदारांनी जो विश्वास माझ्यावर टाकून महा विजय मिळवून दिला त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, मतदार संघाच्या संतुलित विकासाबरोबरच भद्रावती शहर तथा तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असे आश्वासनही प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी दिले. सभेचे प्रास्ताविक प्रशांत काळे यांनी, संचालन सुरज गावंडे यांनी तर आभार लक्ष्मण बोढाले यांनी मानले.सभेच्या यशस्वितेसाठी प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, सुधीर खोब्रागडे, अब्बास अजानी, परवेज शेख, गोरू थैम, प्रविण महाजन,आकाश ढवस,वंदना धानोरकर, ज्योती मोरे, कविता सुफी, लता इंदुरकर, मणीषा ढुमने आदिंनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment