Ads

जागतिक पर्यावरण दिन व महाजनकोच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन

चंद्रपूर -इंडियन रेडक्रॉस सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन , टाटा कॅन्सर फाउंडेशन व चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पर्यावरण दिन व महाजनकोच्या 19 वा वर्धापन दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ऊर्जानगर येथील स्थानिक वसाहतीतील स्नेहबंध सभागृह इथे भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सी.एस.टी.पी.एस. चे कुटुंबप्रमुख श्री गिरीश कुमारवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे अभिनंदन केले व प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सी.एस.टी.पी.एस. व परिसरातील छोटा नागपूर, विचोडा,पडोली,पद्मापूर या गावातील जनतेचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी यथायोग्य काळजी घेऊन औषधोपचार करण्याचे घोषित केले.
Organized grand diagnostic camp on the occasion of World Environment Day and Mahagenco's 19th birth anniversary
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून भाषण करताना श्री गिरीश कुमारवार यांनी सर्व डॉक्टरस व त्यांच्या चमू चे धन्यवाद व्यक्त केले, व वेळोवेळी रोगनिदान शिबिराच्या आयोजनाचा मानस व्यक्त केला, डॉ. भूषण शेंडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या रोग निदान शिबिरामध्ये आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ.संजय घाटे, आय.एम.ए.च्या माजी सचिव डॉ.कल्पना गुलवाडे,डॉ. प्रसाद पोटदुखे,डॉ.स्नेहल पोटदुखे,डॉ.वैभव राठोड, डॉ.सौरभ राजूरकर, डॉ. अभय राठोड,डॉ. आशिष बारब्दे, डॉ. पियुष मेश्राम,डॉ. टिंकल ढेगळे, डॉ. ज्योती मुरमाडकर,डॉ. देवाशीष घुगे,डॉ. भास्कर बारसागडे यांनी आपली या आरोग्य शिबिरात सेवा प्रदान केली.
या रोगनिदान शिबिरामध्ये कान, नाक,घसा रोग,स्त्री रोग, छाती रोग, त्वचारोग,सामान्य रोग,कॅन्सर रोग यांच्यासह ब्लड शुगर तपासणी,ब्लड प्रेशर तपासणी,लिव्हर फंक्शन टेस्ट, प्लमरी फंक्शन टेस्ट,बोंन डेन्सिटीव्ह टेस्ट यांची तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे संचालन सी.एस.टी.पी.एस. च्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता बोधनकर व आभार नरेंद्र रहाटे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्याम राठोड, सुभाष मुरसकर, आरिफ शेख, हेमंत,गेडाम,सागर श्रेष्ठी,विशाल पवार,नरेश आडे व रुपेश ताकसांडे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment