राजुरा 7 जून:-नुकत्याच लागलेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्ये राजुरा येथील रहिवाशी यशस्वी रामरतन चापले हीने पहिल्याच प्रयत्नात 720 गुणापैकी 667 गुण घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकविला आहे.
Yashasvi Ramratan Chaple of Rajura scored 667 marks in NEET examination and stood first from Chandrapur district.
वैद्यकीय प्रवेशासाठी दरवर्षी नीट ही परीक्षा घेतली जाते. यशस्वी ने चंद्रपूर केंद्रावरून ही परीक्षा दिली. यशस्वी ही लहानपणा पासून अभ्यासात हुशार होती. इयत्ता 10 वी तिला 98% आणि यावर्षी 12 वी ला 91% गुण प्राप्त केले. यशस्वी चे आई वडील जिल्हा परिषद शिक्षक आहे. यशस्वी ने आपल्या यशाचे श्रेय आई वडील आणि शिक्षकांना दिले आहे. यशस्वी च्या यशाबद्दल तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 comments:
Post a Comment